फेमस

Lata Mangeshkar : लतादिदींची एकूण संपत्ती किती होती, गाड्यांचंही होत कलेक्शन

लता मंगेशकर यांच्या निधनानंतर संपूर्ण देशावर दुःखाचा डोंगर कोसळा आहे. त्यांच्यापाठी त्यांनी खूप संपत्ती सोडली आहे. त्यांना कारचा खूप छंद होता तसेच त्यांना क्रिकेतदेखील आवडायचे.

Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांच्या निधनानंतर संपूर्ण देशावर दुःखाचा डोंगर कोसळा आहे. त्यांच्यापाठी त्यांनी खूप संपत्ती सोडली आहे. त्यांना कारचा खूप छंद होता तसेच त्यांना क्रिकेतदेखील आवडायचे.

आजच सकाळी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन ब्रीच कँडी रुग्णालयात झाले. त्यांना बरेच दिवसापासून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. कोरोना पोसिटीव्ह झाल्यामुळे त्यांना आईसीयु मध्ये दाखल केले होते. त्यांचे वय 92 होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण संगीत क्षेत्रात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांना गायनासोबतच क्रिकेटचाही छंद होता.

मिळालेल्या माहितीनुसार त्यांची पहिली कमाई 25 रुपये इतकी होती. त्यांना ती वयाच्या 13 व्या वर्षी डेब्यु करून मिळाली होती. त्यांचे राहणीमान अगदी साधे होते. त्यांची आता जवळपास 370 कोटींची संपत्ती आहे. त्यांचे घरदेखील एका चांगल्या मोठ्या ठिकाणी होते. त्या त्यांच्या घरी प्रभुकुंज भवन मध्ये राहत होत्या.

त्यांना कारचा खूप छंद होता, त्यांना वेगवेगळ्या कारची आवड होती. त्यांनी खूप आधी एक मुलाखतीत सांगितले होते की, माझी पहिली कार Chevrolet होती. त्यांनी ती कार इंदोरवरून खरेदी केली होती. त्याच्यानंतर त्यांच्याकडे Buick, Chrysler कार होत्या.
लता दिदींने त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘दिवंगत यश चोप्रानी मला त्यांची बहीण मानलं होतं त्यांनी ‘वीरजारा’ चित्रपटाच्या गाण्यांच्या रिलीजच्या वेळेस माझ्या हातात एक मर्सिडीजची चावी दिली. आणि हे तुझं गिफ्ट असे सांगितले. ती कार अजूनही माझ्याकडे आहे.’

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments