Lata Mangeshkar : लतादीदींच्या जाण्याने देश हळहळला, 2 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळला जाणार
तब्बल 28 दिवसांच्या कोरोनाच्या झुंज देत भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्राणजोत आज मावळली. रविवारी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्या निधनानंतर केंद्राने 2 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

Lata Mangeshkar : तब्बल 28 दिवसांच्या कोरोनाच्या झुंज देत भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्राणजोत आज मावळली. रविवारी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्या निधनानंतर केंद्राने 2 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार दि 6 फेब्रुवारी 2022 रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, 1881 ( सन 1981 चाअधिनियम 26 ) च्या कलम 25 खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितले की, सरकारी कार्यालयांमध्ये दोन दिवस राष्ट्रध्वज अर्धवट राहील. तसेच मृतांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लता मंगेशकरांना अनेक दिग्गज लोक अंतिम दर्शनासाठी त्यांच्या घरी येणार आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा मुंबईत येणार आहे, अशी माहिती त्यांनी ट्वीट करून दिली आहे. पंतप्रधान दादरच्या शिवाजी पार्कला अंतविधीला संध्याकाळी 5 वाजता येणार आहेत, अशी माहिती मुंबई पोलीसांनी दिली आहे. पंतप्रधान पहिलाच मंगेशकर कुटूंबाशी बोले आहेत.
“भारत सरकारने निर्णय घेतला आहे की दिवंगत मान्यवरांच्या सन्मानार्थ 6 फेब्रुवारी (रविवार) ते 7 फेब्रुवारी (सोमवार) पर्यंत 2 (दोन) दिवसांचा राज्य शोक पाळला जाईल,” असे सरकारने एका निवेदनात म्हटले आहे.