Lata Mangeshkar : ‘या’ एका कारणामुळे लतादीदींनी केलं नाही लग्न…
एका मुलाखतीत लता मंगेशकरांनी सांगितले होते की, 'खूप कमी वयात माझ्यावर माझ्या कुटूंबाची जबाबदारी आल्यामुळे आणि मला माझ्या भावंडांना सांभाळायचे होते त्यामुळे माझ्या मनात कधी लग्नाचा विचार आला नाही.'

Lata Mangeshkar : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आपले पूर्ण आयुष्य गायनासाठी व्यतीत केले होते. अगदी वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी गायनाला आणि कामाला सुरुवात केली होती. त्यांनी वेगवेगळ्या भाषेतील अनेक सुपरहिट गाणी जगाला दिली. पण हे सर्व करताना त्यांना खुप कठीण परिस्थितीतून जावे लागले होते तसेच खाजगी आयुष्यातही खूप गोष्टींना त्यांना सामोरे जावे लागले. त्यांच्या वडिलांच्या म्हणजेच दीनानाथ मंगेशकर यांच्या निधनानंतर लता दिदींनी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली. ( Lata Mangeshkar : This is one of the reasons why Lata did not get married …)
या सर्व काळात कधी वेळ निघून गेला हे त्यांना कळलेलंच नाही आणि त्यांनी लग्न केलेच नाही. आज वयाच्या 92 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. खरतर, जेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा त्या अगदीच लहान होत्या. आणि त्यानंतर सर्व जबाबदारी त्यांच्यावर आली. यामुळेच त्यांनी शिक्षणावर जास्त लक्ष न देता आपल्या गायनावर जास्त लक्ष दिले. त्यांच्या वडीलांचे निधन 1942 मध्ये हार्ट अटॅकने झाला. त्यांचे वडील देखील खूप मोठे संगीतकार होते. त्यानंतर त्यांच्या वडिलांचे मित्र मास्टर विनायक यांनी लता दिदींचे करिअर सांभाळले.
एका मुलाखतीत लता मंगेशकरांनी सांगितले होते की, ‘खूप कमी वयात माझ्यावर माझ्या कुटूंबाची जबाबदारी आल्यामुळे आणि मला माझ्या भावंडांना सांभाळायचे होते त्यामुळे माझ्या मनात कधी लग्नाचा विचार आला नाही.’
हे हि वाचा: