आपलं शहर

LPG Gas Subsidies: LPG गॅस सिलेंडर सबसिडीबद्दल जाणून घ्या ऑनलाईन… अशी असेल प्रोसेस

LPG गॅस सिलेंडरची सबसिडी ही थेट तुमच्या बँक खात्यात जमा होते. पण LPG गॅस सिलेंडरवर तुम्हाला ही सबसिडी मिळते की नाही ? तुम्ही सबसिडी साठी पात्र आहात की नाही आणि असाल तर सबसिडी मिळते की नाही ? जर सबसिडी नसेल मिळत तर काय करावे लागेल ? हे आज आपण जाणून घेऊयात.

LPG Gas Subsidies: LPG गॅस सिलेंडरची सबसिडी ही थेट तुमच्या बँक खात्यात जमा होते. पण LPG गॅस सिलेंडरवर तुम्हाला ही सबसिडी मिळते की नाही ? तुम्ही सबसिडी साठी पात्र आहात की नाही आणि असाल तर सबसिडी मिळते की नाही ? जर सबसिडी नसेल मिळत तर काय करावे लागेल ? हे आज आपण जाणून घेऊयात

तुम्हाला सर्वप्रथम तुमचा आधार क्रमांक तुमच्या बँक खात्याशी लिंक करावा लागेल. LPG गॅस सिलेंडरची सबसिडी ही वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी आहे. तसेच ज्या दाम्पत्याचे वार्षिक उत्पन्न 10 लाखापेक्षा जास्त आहे ते सबसिडीसाठी पात्र नाहीत. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 10 लाखांपेक्षा कमी आहे ते दाम्पत्य सबसिडीसाठी पात्र आहेत. तुमचा आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक केल्यावर तुम्हाला सबसिडीचे पैसे खात्यात येऊ लागतील.

सबसिडी न मिळण्याचे प्रमुख कारण म्हणजे LPG आयडी खाते क्रमांकाशी लिंक न करणे. यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या डिस्ट्रिब्यूटरशी संपर्क साधून त्याला तुमच्या समस्येची जाणीव करून द्यावी. त्याच वेळी, तुम्ही 18002333555 या टोल फ्री क्रमांकावर फोन करून तुमची तक्रार नोंदवू शकता.

ऑनलाईन तुम्ही तपासू शकता :-
1. पहिले www.mylpg.in या वेबसाईटवर जावे लागेल.
2. वेबसाइटवर गेल्यावर तुम्हाला उजवीकडे 3 कंपन्याच्या सिलेंडरचे (Bharat Gas, HP Gas, Indane) फोटो दिसतील.
3. इथे तुम्हाला तुमचा ज्या कंपनीचा गॅस आहे तो गॅस सिलेक्ट करायचा आहे.
4. यानंतर एक विंडो ओपन होईल, त्यात तुम्हाला तुमच्या सर्व्हिस प्रॉव्हायडरची माहिती दिसेल
5. मग तुम्हाला उजवीकडे वरच्या बाजूला sign in आणि New user दिसेल. जर तुम्ही पहिलाच रजिस्टर केले असेल तर sign in करावे लागेल जर नसेल केले तर New user वर क्लिक करावे लागेल.
6. यानंतर एक नवीन विंडो चालू होईल तेथे तुम्हाला उजव्या बाजूला view cylinder booking history हा पर्याय निवडा.
तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्हाला सबसिडी मिळते की नाही ते. जर नसेल मिळत तर 18002333555 या तोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments