मंत्रालय

Maharashtra Corona Update New Corona Rule in Maharashtra : 1 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात नवे निर्बंध; जाणून घ्या नवे नियम

लसीकरण पूर्ण झालेल्या जिल्ह्यांमध्ये पर्यटन स्थळे, तसेच उद्याने 50 टक्के क्षमतेने सुरु करण्यात येणार आहेत.

1 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात नवे निर्बंध; जाणून घ्या नवे नियम

ओमिक्रॉनची भारतात तीसरी लाट आल्यामुळे मध्यंतरी रुग्णांची वाढ ही झपाट्याने होताना दिसत होती, त्यामुळे सरकारने निर्बंध वाढवले होते; पण महाराष्ट्रात सध्या काही चित्र हे वेगळच आहे. रुग्णांची संख्या घटत आहे. नव्या रुग्णांच्या नोंदी कमी आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने निर्बंध कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने निर्बंध शिथिल केले आहेत.

हे आहेत नवे नियम

लसीकरण पूर्ण झालेल्या जिल्ह्यांमध्ये पर्यटन स्थळे, तसेच उद्याने 50 टक्के क्षमतेने सुरु करण्यात येणार आहेत.

नव्या कोविड नियमांतर्गत 1 फेब्रुवारीपासून अंत्ययात्रांमधील उपस्थितीवर आता कोणतेही निर्बंध लागू नसतील.

स्थानिक परिस्थिती लक्षात घेता, रात्रीच्या संचारबंदीबद्दलचे नियमही शिथिल करण्याचे अधिकार तेथील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

लग्नसमारंभासाठी आता 200 जणांना निमंत्रण देता येणार आहे.

म्हणून घेतला निर्णय

सोमवारी शहरांममध्ये रुग्णांच्या संख्येत घाट दिसून आली, एक हजारून कमी रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. पुणे जिल्हयात कोरोना रूणांची गेल्या आठ दिवसांत मोठी घट दिसून आली आहे. आठ दिवसांपूर्वी 93 हजार 642 वर पोहोचलेली ही संख्या सोमवारी 60 हजारांच्या आत आली आहे.

ओमिक्रॉनमुळे महाराष्ट्र सरकारने 10 जानेवारीपासून निर्बंध लावण्यात आले होते; पण आता रुग्ण संख्या घटत असल्यामुळे सरकारने निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा : penguin issue : पेंग्विनच्या प्रेमावरून किशोरी पेडणेकर आणि चित्रा वाघ पुन्हा भिडल्या

Hindustani Bhau Arrested : हिंदुस्तानी भाऊला ताब्यात घेताच पोलिसांनी केलं महत्वाचं काम

Corona Vaccine Treats : लसीमुळे केवळ कोरोनापासून नव्हे तर या 21 आजारांपासून मिळतंय संरक्षण ; WHO चा दावा

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments