फेमस

Mahesh Manjarekar Arrested : दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना अटक होणार का?

दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि काही संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला आहे.

Mahesh Manjarekar Arrested : दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि काही संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला आहे. 14 जानेवारी 2022 ला प्रदर्शित झालेल्या महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नाय वरण-भात लोंचा कोन नाय कोंचा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते आणि अन्य संबंधित व्यक्तींवर माहिम पोलीस स्थानकात गुन्हा स्त्री शक्ती संघटनेच्या वतीने लेखी तक्रार केली होती.

त्यानंतर तेथील पोलीस उपायुक्त व सहआयुक्त यांनी मुंबई इथे तक्रार केली. एफआयआर वाचल्यानंतर उच्च न्यायालयाने आज कोणताही रिलीफ देता येणार नाही असे सांगितले आहे. आरोपींच्या वकिलांनी सोमवार पर्यंत अटक करू नका अशी विनंती केली ती सुद्धा न्यायालयाने फेटाळली.

या चित्रपटात बाल कलाकारांनी खूप टोकाची भूमिका, आक्षेपार्ह भाषा, वर्तन, जवळच्या महिला नातेवाईकांसोबत अनैतिक संबंध, लैंगिक संबंधात गुंतने आणि अश्लील भाषासुद्धा त्यांच्या तोंडी आहे. त्यामुळेच, 13 ते 15 वर्षे वयोगटातील बालकलाकारांकडून असे काम करून घेतल्याबद्दल दिग्दर्शक, निर्माते आणि सह संबंधित व्यक्ती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या तक्रारीवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही म्हणून भारतीय स्त्रीशक्ती संस्थेच्या सीमा देशपांडे यांनी प्रकाश सालसिंगिकर यांच्या मार्फत न्यायालयात दाद मागितली.

या चित्रपटाच्या माध्यमातून मुंबईतील गिरणी कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील स्त्रीयांचे अतिशय विकृत चित्रीकरण करण्यात आले आहे तसेच या चित्रपटात भारताच्या पोक्सो (POCSO) सहीत अन्य कायद्यांचे उल्लंघन झाले आहे, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आता महेश मांजरेकर आणि संबंधित व्यक्तींना अटक होणार की नाही ? यावर सर्वांचे लक्ष आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments