बीएमसी

‘डबेवाल्याचा मुलगा’ मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात

आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकासाठी मुंबई महानगर पालिका प्रभाग क्रमांक 4 मध्ये गल्लोगल्ली प्रचार फेरी काढून सर्व परिसरात प्रचाराला देखील सुरवात केली आहे.

BMC Election 2022 : कोरोनामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक फेब्रुवारीमध्ये होणारी पुढे ढकलण्यात आली आहे. परंतु मुंबई महानगर पालिकेची निवडणूक मार्चपर्यंत जाहीर होऊ शकते, अस अंदाज वर्तवला जात आहे. मुंबई महानगर पालिकेच्या नविन प्रभाग रचना जाहीर झाल्या आहेत. कोणत्या पक्षाची युती होईल की आघाडी होईल याची आणि जागा वाटपाची उत्सुकता, इच्छुकांची घालमेल असे चित्र सर्वत्र दिसेल.

ज्यांना तिकीटे मिळाली नाहीत, ते अपक्ष म्हणून लढायला तयारदेखील होतील. आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकासाठी मुंबई महानगर पालिका प्रभाग क्रमांक 4 मध्ये गल्लोगल्ली प्रचार फेरी काढून सर्व परिसरात प्रचाराला देखील सुरवात केली आहे. आता सर्वांना वाटेल अजून निवडणूक जाहीर झाली नाही तर प्रचार कसा? तर 130 वर्षाची मुंबईत परंपरा असलेले डबेवाले यावर्षी निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. मुंबईतील डबेवाल्याचा मुलगा मंगेश पांगारे अपक्ष म्हणुन मुंबई महानगर पालिकेची निवडणुक लढणार आहे.

दहिसर विभागात राहणारा, एक सर्वसामान्य डबेवाल्याचा मुलगा, क्षितीज ग्रुपचा संस्थापक, डबेवाल्यांचे व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी थेट राजकारणात उडी घेण्याचं ठरवतो, ही मोठी गोष्ट आहे.

त्यासाठी त्याने क्षितीज ग्रुपच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 4 मध्ये समाजसेवेचे व्रत गेली पंधरा वर्ष हाती घेतले आहे. या पंधरा वर्षात त्याने हजारो लोकांची कामे करून दिली आहेत. त्यांने क्षितीज ग्रुपच्या माध्यमातून प्रभागातील विद्यार्थी, युवक, बेरोजगार,महीला,पुरुष, जेष्ठ नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या आहेत.

डब्बेवाल्यांची अपेक्षा काय?

मंगेश पांगारे हा एक डबेवाल्याचा मुलगा आहे तो प्रभागामध्ये चांगले काम करत असून असा चांगले काम करणारा व्यक्ती मुंबई महानगर पालिकेत निवडुन गेला पाहीजे, अशी धारणा विभागातील प्रत्येक डबेवाल्यांची आहे. गेल्या काही वर्षात गिरणी कामगार आणि माथाडी कामगार यांची मुले राजकारणात सक्रीय झाली आणि ती पुढे खासदार, आमदार, नगरसेवक झाली. त्यांनी आपले प्रश्न मांडले त्याच पाश्वभुमीवर डबेवाल्याच्या मुलानेही राजकारणात प्रवेश करायचा निश्चय केला तर मुंबई डबेवाला असोशिएशन त्याचे स्वागत करील व त्याला सर्वोतोपरी सहकार्य करील अशा भावना मुंबई डबेवाला असोसिएशनच्या सदस्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments