लोकल

Mega Block Central Railway : 5 ते 7 फेब्रुवारीदरम्यान 72 तासांचा महामेगाब्लॉक, शंभर पेक्षा जास्त एक्स्प्रेस झाल्या रद्द…

5 ते 7 फेब्रुवारीदरम्यान घेण्यात येणाऱ्या 72 तासांच्या महामेगाब्लॉकमध्ये मुख्यतः 6व्या मार्गिकेचे काम पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे.

गेल्या महिन्यात 8 तारखेला ठाणे दिवा दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिके संबंधित कामांसाठी 36 तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. तसेच, त्याआधी 2 ते 3 जानेवारी दरम्यानदेखील 24 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. विशेष म्हणजे मध्य रेल्वेवर एका महिन्याच्या आत तिसरा महामेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक 72 तासांचा असून 5 ते 7 फेब्रुवारीदरम्यान ब्लॉक घेण्यात येईल. मेगाब्लॉक मुख्यतः, ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान 5व्या लाईनवर आणि दिवा ते ठाणे स्थानकादरम्यान अप फास्ट लाईन आणि 6व्या लाईनवर असणार आहे. यामुळे काही एक्स्प्रेस गाड्या रद्द होणार आहेत. याचा मोठा परिणाम माघी गणपतीसाठी गावी जाणाऱ्या कोकणातील चाकरमान्यांना होणार आहे. ( Mega Block Central Railway: 72-hour Mahamega Block between February 5 to 7, more than 100 expresses canceled… )

5 ते 7 फेब्रुवारीदरम्यान घेण्यात येणाऱ्या 72 तासांच्या महामेगाब्लॉकमध्ये मुख्यतः 6व्या मार्गिकेचे काम पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे. या मेगाब्लॉकनंतर दोन्ही मार्गिका रेल्वे प्रशासनासाठी पूर्णतः तयार असतील. या मेगाब्लॉकदरम्यान कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्या रद्द असणार आहेत, त्यामुळे गणेश जयंतीच्या वेळी चाकरमान्यांचे गावी जाणे कठीण होणार आहे. कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्या 3 दिवस बंद राहणार आहेत. कोकणात जाणाऱ्या तेजस, जनशताब्दी, एसी डबल डेकर 5 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारीदरम्यान बंद राहणार आहेत. तसेच, कोच्चूवेली , मंगलोर, हुबळी या एक्सप्रेस गाड्यादेखील 5 ते 7 फेब्रुवारी रोजी बंद राहणार आहेत. (Is there mega block in Mumbai? )

डेक्कन एक्सप्रेस, डेक्कन क्वीन एक्सप्रेस, जालना जन शताब्दी, कोयना एक्सप्रेस, पंचवटी एक्सप्रेस 5 ते 7 फेब्रुवारीपर्यंत रद्द केले गेले आहेत. रद्द झालेल्या गाड्यांमध्ये आणखीन 100 एक्सप्रेस आणि मेलचादेखील समावेश आहे. दिवा ते वसईदरम्यान धावणारी दिवा वाया वसई गाडी तीन दिवस रद्द करण्यात येणार आहे. ( What is mega block in Railway? )

हे हि वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments