आंतरराष्ट्रीय

Facebook-Meta Issue : फेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद होण्याच्या मार्गाला…..

फेसबुकच्या रोजच्या वापरकर्त्यांच्या संख्येत 5 लाखांनी घट झाली आहे. त्यामुळे मेटा कंपनीचे फार मोठे नुकसान झाले आहे.

Facebook-Meta Issue : फेसबुकच्या रोजच्या वापरकर्त्यांच्या संख्येत 5 लाखांनी घट झाली आहे. त्यामुळे मेटा कंपनीचे फार मोठे नुकसान झाले आहे. मेटा कंपनी फेसबुक आणि इंस्टाग्रामची मालक आहे. त्याचे मूल्य 15 लाख कोटींनी घटले आहे. तसेच शेअर्स सुद्धा 20 टक्क्यांनी खाली आले आहेत. त्यामुळे मेटा कंपनीला खूप गोष्टींचा सामना करावा लागत आहे आणि त्यातच मेटाचे युरोपमध्ये खूप अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे तेथे कंपनी सेवा बंद करू शकते.

जुलै 2020 मध्ये युरोपियन न्यायालयानं प्रायव्हसी शील्ड कायदा रद्द केला. या कायद्याअंतर्गत मेटा कंपनी युरोपियन वापरकर्त्यांचा तपशील अमेरिकास्थित सर्व्हरमध्ये हलवण्याचा, साठवण्याचा आणि प्रक्रिया करण्याचा पर्याय होता. तसेच यरोपात सध्या माहिती हस्तांतरित करण्यासाठी मोठी पावलं उचलली जात आहेत. त्यामुळे मेटा कंपनीला खूप अडचणी आल्या आहेत.

कंपनीला आपल्या वापरकर्त्यांचा तपशील अमेरिकास्थित सर्व्हरमध्ये हलवण्याचा, साठवण्याचा आणि प्रक्रिया करण्याचा पर्याय न मिळाल्यास युरोपमधील फेसबुक, इन्स्टाग्राममधील सेवा बंद करावी लागू शकते, असं मेटानं आपल्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. कंपन्यांना प्रायव्हसी शील्ड आणि दुसऱ्या मॉडल कराराच्या माध्यमातून माहिती हस्तांतरित करण्याचा पर्याय मिळत होता याच्याच मदतीनं मेटाकडून युरोपीय वापरकर्त्यांची माहिती अमेरिकन सर्व्हरवर साठवली जात होती. मात्र आता या कायद्याला मान्यता नाही. जुलै 2020 मध्ये प्रायव्हसी शील्ड हा कायदा युरोपमध्ये रद्द करण्यात आला.

प्रायव्हसी शील्डसोबतच मेटाकडून युरोपियन वापरकर्त्यांची माहिती अमेरिकन सर्व्हरवर साठवण्यासाठी स्टँडर्ड काँट्रॅक्टच्युएल क्लॉसेसचा वापर केला जायचा. मात्र आता हे मॉडल ऍग्रीमेंटदेखील ब्रसेल्ससह युरोपातील अनेक भागांत चौकशीच्या फेऱ्यात अडकलं आहे. त्याबद्दल तपास सुरू आहे. त्यामुळे मेटासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments