Meta Shares Crash : मेटाचे नुकसान ठरले अंबानी-अदानींसाठी फायद्याचे; मार्क झुकरबर्ग यांना मोठा धक्का….
ब्लूमबर्ग बिलिनियर इंडेक्सच्या अनुसार, 2 फेब्रुवारीपासून मेटा शेअर्समध्ये घसरण चालू आहे. $ 120.6 अब्ज असणारी मार्क यांची संपत्ती 2 फेब्रुवारीला $97 अब्ज इतकी घसरली.

गेल्या 2 महिन्यांपूर्वी अदानी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे मालक गौतम अदानी यांनी मुकेश अंबानी यांना धोबी पछाड देत, आशियातील श्रीमंत व्यक्ती म्हणून नव्या रूपाने उदयास आले. तसेच काही तरी गुरुवारी अंतरराष्ट्रीय बाजारात घडले. 3 फेब्रुवारी हा दिवस मेटाचे मालक मार्क झुकरबर्ग यांच्यासाठी जणू वाईट स्वप्नच! कारण गुरुवारी मेटा शेअर्समध्ये झालेली घसरण मार्क झुकरबर्ग यांना चांगलीच महागात पडली आहे. झालेल्या 26%च्या घसरणीमुळे, मेटाला तब्बल 200 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. परिणामी, मार्क जगातील 10 श्रीमंत व्यक्तींच्या यादीतून बाहेर पडले आहेत. ( Meta Shares Crash: Loss of Meta is beneficial for Ambani-Adani; Big shock to Mark Zuckerberg… )
जरी मार्क यांच्या तिजोरीला अब्जो डॉलरचा फटका बसला आहे. मात्र या गोष्टीचा फायदा भारतातील श्रीमंत व्यक्तिमत्व असणारे अदानी आणि अंबानी यांना मोठ्या प्रमाणात झाला आहे. शेअर्समध्ये झालेल्या नुकसानामुळे मेटाचे मलिक मार्क झुकरबर्ग जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अदानी आणि अंबानींच्यादेखील मागे पडले आहेत.
ब्लूमबर्ग बिलिनियर इंडेक्सच्या अनुसार, 2 फेब्रुवारीपासून मेटा शेअर्समध्ये घसरण चालू आहे. $ 120.6 अब्ज असणारी मार्क यांची संपत्ती 2 फेब्रुवारीला $97 अब्ज इतकी घसरली. मेटाचे मुख्य आर्थिक अधिकारी व्हेन देव्हर म्हणाले की, ” इतर घटकांच्या दरातील वाढीमुळेहि घसरण होण्याची अधिक शक्यता आहे.” मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी डेटा पॅकेजच्या दरात केलेल्या वाढीचा मेटाच्या विकासावर परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
हे हि वाचा: