Metro 3 Construction : मेट्रो 3 कारशेडच्या जागेवरून पुन्हा वाद पेटणार…
2014 पासून सुरू झालेल्या मेट्रो 3 च्या कारशेडच्या जागेवरील वाद आता पुन्हा पेटणार आहे. रविवारी पर्यावरणप्रेमी आरेतील पिकनिक पॉइंट येथे मोर्चा काढणार आहेत. आरेतील कारशेडची जागेच स्थलांतरित अद्यापही झाले नाही ते हलवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

Metro 3 Construction : 2014 पासून सुरू झालेल्या मेट्रो 3 च्या कारशेडच्या जागेवरील वाद आता पुन्हा पेटणार आहे. रविवारी पर्यावरणप्रेमी आरेतील पिकनिक पॉइंट येथे मोर्चा काढणार आहेत. आरेतील कारशेडची जागेच स्थलांतरित अद्यापही झाले नाही ते हलवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
भाजप-शिवसेना सरकारने आरेत मेट्रो 3 चे कारशेड उभारले जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु या निर्णयाला शिवेसनेने आणि पर्यावरणप्रेमींनी कडाडून विरोध केला होता. मात्र 2019 मध्ये शिवसेनेने भाजपसोबत ताटातूट करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. या सरकारने मेट्रो 3 च्या कारशेड कंजूरमार्ग येथे उभारण्यात येण्याचे सांगितले होते. पण याच्या काहीच हालचाली या 2 वर्षांच्या काळात दिसण्यात आली नाहीत.
शिवाय आरेतील जागेत चोरीछुपे काम सुरू असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. या आरेतील मेट्रो-कारशेडच्या जागेवर हळूहळू काम सुरू झाले आहे. या जागेवर मोठे बॅरिकेट्स टाकण्यात आले आहे. तसेच मोठे मोठे खांब उभारण्यात आले आहे आणि आतमध्ये खड्डे तयार करून त्यात पाणी भरण्याचे काम सुरू आहे. ही सर्व घटना पाहिल्यानंतर पर्यावरणप्रेमींनी प्रश्न विचारले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यानंतर पर्यावरणप्रेमींनी या सर्व कामाचा व्हिडिओ काढला. तेव्हा हे काम बंद करण्यात आले. या सर्व घटनेबाबत राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.
पर्यावरणप्रेमींनी होणाऱ्या आंदोलनाबाबत माहिती देण्यासाठी आरे पोलीस ठाण्याला भेट दिली. पण कोरोनाच्या प्रश्वभूमीवर मोठ्या संख्येने उपस्थित राहता येणार नाही आणि झाल्यास जमावबंदी लागू होईल, असे पोलीसांनी पर्यावरणप्रेमींना सांगितले.