ऋचा चड्डाच्या’ या’ कामामुळे लाखो मुंबईकर करत आहेत कौतुक
मुंबईच्या रस्त्यावर तुम्हाला कोणी म्हणेल की या आणि मला मिठी मारा, तर तुमच्या मनात आधी काय विचार येईल?

Richa Chadha : ऋचा चड्डाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती मुंबईच्या रस्त्यावर उभी राहून रस्त्यावरून येणाऱ्या जाणार्या लोकांना मिठी मारण्यासाठी आमंत्रण देते. ऋचाच्या हातात एक बॅनर आहे, ज्यावर ‘FREE HUGS’ असे लिहिले आहे.
ऋचाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती रस्त्याच्या फूटपाथवर उभी असलेली पाहायला दिसतेय. ऋचाच्या हातात एक बोर्ड आहे आणि त्यावर FREE HUGS असं लिहिलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतो, कारण एखाद्या सेलिब्रिटीने मुंबईच्या रस्त्यावर उतरून येणाऱ्या जाणार्या सामान्य नागरिकांना मिठी मारणे, हे पहिली वेळ घडत आहे.
आता तुम्हाला वाटेल की ऋचा फक्त स्त्रियांना मिठी मारते, तर व्हिडीओ पुढे पुढे पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की ऋचाही अशा अनेक पुरुषांना जवळ करत आहे, जे तिच्या ओळखीचेदेखील नाहीत. यातून ती इतरांसोबत प्रेम शेअर करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीच्या इन्स्टाग्रामवर ऋचा चड्डाचा हा व्हिडिओ चाहत्यांमध्ये खूप चर्चेत आहे. हा व्हिडिओ वर्ष 2020 आहे, 21 जानेवारीला राष्ट्रीय आलिंगन दिन म्हणून साजरा केला जात होता, तेव्हाचा हा व्हिडीओ आहे. अज्ञात लोकांना मिठी मारा, आनंदी राहा आणि प्रेम शेअर करा, असाच मॅसेज ऋचा चड्डाला द्यायचा होता.
View this post on Instagram