राजकारण

मोदीजी, आपसे नाराज नही! हैरान हूँ मैं – खासदार सुप्रियाताई सुळे 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना महाराष्ट्र काँग्रेसवर टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना महाराष्ट्र काँग्रेसवर टीका केली. देशात कोरोना पसरवण्यात महाराष्ट्र काँग्रेसचा हात आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिउत्तर देण्यात आलं आहे. ( Modi ji, not angry with you! I am surprised – MP Supriyatai Sule )

यावर बोलताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भावनिक होऊन उत्तर दिलं आहे, पंतप्रधानजी आपसे नाराज नही! हैरान हूँ मैं. माझ्या महाराष्ट्राबद्दल तुम्ही असं कसं बोललात? आमच्यावर का टिका केली राज्याराज्यात द्वेष पसरवत आहात असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पंतप्रधानांना आज केला आहे. आज दिल्ली येथे माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याने मनस्वी दु:ख झाल्याचे सांगितले.

महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर कधी झुकला नाही आणि कधी झुकणार नाही. हा कुठल्या पक्षाचा प्रश्न नाही तर हा राज्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे. राज्यातील भाजप आमदार खासदारांनी याविरोधात उभं राहिले पाहिजे असेही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ठणकावून सांगितले.

रेल्वे सोडण्याचा निर्णय हा केंद्रसरकारचा होता तो महाराष्ट्राचा नव्हता. महाराष्ट्राने बस, खाजगी गाड्या दिल्या. रेल्वे महाराष्ट्र सरकार नाही तर केंद्रसरकार चालवते तरी पंतप्रधान असं वक्तव्य करतात हे दुर्दैवी आहे असेही खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.

हे हि वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments