राजकारण

Mohit Kamboj On Sanjay Raut : राऊतानंतर आता BJP नेते म्हणतात, सलीम-जावेदची जोडी जेलमध्ये जाणार, अख्खा महाराष्ट्र पाहणार

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर मोहित कंबोज यांनी देखील प्रत्युत्तर दिलं.

मुंबई : बाप बेटे जेलमध्ये जातील की नाही जातील, हे वेळ ठरवेल, मात्र सलीम-जावेद यांची जोडी जेलमध्ये जाणार (Mohit Kamboj On Sanjay Raut) आणि अख्खा महाराष्ट्र पाहणार, असे सणसणीत प्रतिउत्तर भाजप नेते मोहित कंबोज यांनी संजय राऊत यांच्या ट्विटला दिले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या काल (15 फेब्रुवारी) झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सोमय्या यांचा आणि मुलगा नील सोमय्या (Neel Somaiya) याच्यावर देखील पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी आरोप केला. पीएमसी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी वाधवान याच्याशी निल सोमय्या याचा संबंध असल्याचा आरोप राऊत यांनी केला.

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर मोहित कंबोज यांनी देखील प्रत्युत्तर दिलं. आज (16 फेब्रुवारी) संजय राऊत यांनी बाप बेटे जेलमध्ये जाणार असं म्हणत सूचक ट्विट केलं. त्यावर रिट्विट करत मोहित कंबोज यांनी सलीम-जावेदची जोडी जेलमध्ये जाणार असा आरोप केला. यामध्ये कंबोज यांनी नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्यावर नाव न घेता आरोप केला.

मोहित कंबोज नेमकं काय म्हणाले? 

शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांना प्रतिउत्तर देत मोहित कंबोज म्हणतात, बाप-बेटे जेलमध्ये जातील, अस संजय राऊत साहेबांनी ट्विट केलं. बाप बेटे जेलमध्ये जातील की नाही जातील, हे वेळ ठरवेल. मात्र सलीम आणि जावेद नक्कीच जेलमध्ये जातील. आपण समजू शकता सलीम कोण आणि जावेद कोण… आता सलीम आधी जेलमध्ये जाईल की जावेद, यामध्ये स्पर्धा आहे. अनिल देशमुखांशी पहिली भेट कुणाची होईल, त्यामुळे आता अख्खा महाराष्ट्र बघेल, अनिल देशमुख यांच्यासोबत जेलमध्ये कोण असणार…

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments