Ambani Favourite Food : अंबानी घराण्याचं सगळ्यात आवडं हॉटेल, शेअर केला हॉटेलमधला आवडा पदार्थ
उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियाविषयी सर्वांनाच जाणून घ्यायचे असते. सर्वांना त्यांच्या राहणीमान आणि अनेक गोष्टीचे अप्रूप वाटत असते. आणि त्यांचे चाहते हे सर्व जाणून घेण्यासाठी खूप उत्सुकत असतात. मुंबईतील 'स्वाति' रेस्टॉरंट हे अंबानी कुटुंबियांचे आवडते रेस्टॉरंट आहे.

Ambani Favourite Food : उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियाविषयी सर्वांनाच जाणून घ्यायचे असते. सर्वांना त्यांच्या राहणीमान आणि अनेक गोष्टीचे अप्रूप वाटत असते. आणि त्यांचे चाहते हे सर्व जाणून घेण्यासाठी खूप उत्सुकत असतात. तसेच आज आपण त्यांच्या आवडत्या रेस्टॉरंटबदल जाणून घेऊयात.
मुंबईतील ‘स्वाति’ रेस्टॉरंट हे अंबानी कुटुंबियांचे आवडते रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटची मालकीन आशा झवेरी या आहेत. त्यांनी त्यांच्या आईच्या म्हणजेच मिनाक्षी झवेरी यांच्या निधनानंतर 1979 मध्ये हे रेस्टॉरंट सांभाळण्यास घेतले.
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोणत्या रेस्टॉरंट मध्ये आणि कोणते पदार्थ खाण्यास आवडतात हे सर्वांसाठी आश्चर्य असलेली गोष्ट आहे. मुकेश अंबानी यांनी शेअर केल्या पोस्टमध्ये स्वाति रेस्टॉरंटचे नाव पुढे आले आहे. या पोस्टमध्ये अंबानी म्हणाले आहे की, आठवड्यातून आम्ही एकदा तरी या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातो. यावरून हे रेस्टॉरंट अंबानी कुटुंबाचे आवडते रेस्टॉरंट आहे.
अंबानी आणि अनेक सेलेब्रिटी या रेस्टॉरंटमध्ये 1963 पासून येतात. त्यांना या रेस्टॉरंटमधील वेगळे आणि हटके पदार्थ आवडतात.
या रेस्टॉरंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ मिळतात आणि हीच या रेस्टॉरंटची खासियत आहे. त्यांची स्पेशल डिश पेरू-नुशा आणि मेथीची चपती यांचं कॉम्बिनेशन हे आहे. पेरू-नुशा हा पेरूपासून बनवला जाणारा पदार्थ असून जैन समाजात लोकप्रिय आहे. त्याच वेळी, मेथीचा स्वतःचा एक विशेष कडूपणा असतो आणि ही खासियत गोड करीशी परिपूर्ण जुळते.