लोकल

उन्हाळ्यात मुंबईकरांना गारेगार प्रवास होईल शक्य, एसी लोकलचे तिकीट दर कमी होणार? पहा तिकिटांचा दर काय?

मेट्रो ट्रेनच्या तिकीट दरावर एसी लोकलचा दर ठरवण्यात यावा, असा प्रस्ताव रेल्वे बोर्डाने दिला आहे.

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी मोठी आनंदाची बातमी असून मुंबईकरांना लवकरच गारेगार एसीमधून कूल प्रवास (Mumbai AC Local Ticket) करण्यास मिळणार आहे. रेल्वे बोर्डाने एसी लोकलचा तिकीट दर कमी करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे लवकरच मुंबईकर एसी लोकलमधून प्रवास करू शकतील, आणि त्यांचा प्रवास अधिक सुखकर देखील होईल.

“मेट्रोच्या तिकीट दरावर एसी लोकलचे दर ठरविण्यात यावे”

रेल्वे बोर्डाने एसी लोकलच्या एकेरी प्रवासासाठी असणारे दर कमी करावं तसेच मेट्रो ट्रेनच्या तिकीट दरावर (Mumbai AC Local Ticket Rate) एसी लोकलचा दर ठरवण्यात यावा, असा प्रस्ताव दिला. रेल्वे बोर्डाचा हा प्रस्ताव स्वीकारल्यास मुंबईकरांना स्वस्तात एसी लोकलमधून प्रवास करणे शक्य होणार आहे. याचा चांगला परिणाम म्हणजे, लोकलमध्ये होणारी गर्दी देखील कमी होऊ शकते.

सध्या एसी लोकलकडे मुंबईकरांचा कानाडोळा

सद्यपरिस्थिती पाहता एसी लोकलचे दर मुंबईकरांच्या खिशाला न परवडणारे आहेत. त्यामुळे एसी लोकलला म्हणावा तेवढा प्रतिसाद नाही. लोकांचा अल्प प्रतिसाद असल्याने एसी लोकलच्या फेऱ्या देखील कमी करण्यात आल्या आहेत. अनेकदा एसी लोकल आल्याने त्यानंतर असणाऱ्या सामान्य लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पहायला मिळते. एसी लोकलमुळे उशीर झाल्याच्या देखील अनेक मुंबईकरांच्या तक्रारी आहेत. सद्य परिस्थिती पाहता एसी लोकलकडे मुंबईकरांचा कल वाढवा म्हणून रेल्वे बोर्डाने एसी लोकलचं तिकीट भाडं कमी करण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाला दिला, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

एसी लोकलचे प्रस्तावित भाडे किती असेल?

  • सध्या 5 किमीसाठी 65 रुपये द्यावे लागतात, आता 10 रुपये द्यावे लागतील.
  • सध्या 10 किमीसाठी 65 रुपये द्यावे लागतात, आता 20 रुपये द्यावे लागतील.
  • सध्या 15 किमीसाठी 90 रुपये द्यावे लागतात, आता 30 रुपये द्यावे लागतील.
  • सध्या 20 किमीसाठी 135 रुपये द्यावे लागतात, आता 40 रुपये द्यावे लागतील.
  • सध्या 25 किमीसाठी 135 रुपये द्यावे लागतात, आता 50 रुपए द्यावे लागतील.
  • सध्या 30 किमीसाठी 175 रुपये द्यावे लागतात, आता 60 रुपये द्यावे लागतील.
  • सध्या 35 किमीसाठी 180 रुपये द्यावे लागतात, आता 70 रुपये द्यावे लागतील.
  • सध्या 40 किमीसाठी 190 रुपये द्यावे लागतात, आता 80 रुपये द्यावे लागतील.
  • सध्या 55 किमीसाठी 205 रुपये द्यावे लागतात, आता 80 रुपये द्यावे लागतील.
  • सध्या 60 किमीसाठी 220 रुपये द्यावे लागतात, आता 80 रुपये द्यावे लागतील.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments