Mumbai : झटक्यात बदललं रिक्षात झोपणाऱ्या चालकाचं आयुष्य, ‘त्या’ गोष्टीने केली कमाल
सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होतात आणि अनेक लोकांची पसंतीसुद्धा मिळते. तसेच मुंबईतील एका रिक्षाचालकासोबतदेखील एक घटना घडली आणि तो लखपती झाला.

Mumbai : सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होतात आणि अनेक लोकांची पसंतीसुद्धा मिळते. तसेच मुंबईतील एका रिक्षाचालकासोबतदेखील एक घटना घडली आणि तो लखपती झाला.
मुंबईतील देशराज जोदसिंह बियाडू नावाच्या रिक्षाचालकाची मेहनतीची कहाणी ‘ह्यूमन्स ऑफ बॉम्बे’ या इन्स्टंग्राम पेजवर पोस्ट करण्यात आली. मग त्या कहाणीला लोकांचा खूप छान प्रतिसाद मिळाला.
देशराज जोदसिंग बियाडू हा रिक्षाचालक सकाळी 6 वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत आपल्या नातवंडांच्या उच्च शिक्षणासाठी रिक्षा चालवायचा. त्याच्या या मेहनतीबद्दल आणि जिद्दीबद्दल त्या पोस्टद्वारे अनेक मुंबईकरांपर्यंत ती कहाणी पोहचली.
मग थोडे थोडे पैसे जमा करून लोकांनी जवळजवळ 24 लाख रुपये जमा केले. कधीकाळी रोज रिक्षात झोपणार हा माणूस त्याचे आज स्वतःचे घर आहे.
व्हिडिओ शेर करताना या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “11 फेब्रुवारी 2022 ला, आम्ही देशराजजींची कहाणी तुमच्यासोबत शेर केली – एक रिक्षावाला जो आपल्या नातवंडांच्या चांगल्या शिक्षणासाठी एक-एक पैसा जमा करत आहे. खूप कमी वेळात, हजारो लोक पुढे आले आणि 24 लाख रुपये त्यांच्यासाठी जमा केले !”
हे सर्व तुमच्या प्रेमामुळे आणि मदतीमुळे शक्य झाले, आज तुमच्यामुळे देशराजजींच्या डोक्यावर छत आहे आणि ते त्यांच्या नातवंडांचे शिक्षणसुद्धा करू शकतात.
दयाळूपणा आणि मानवतेवर आमच्या विश्वास केल्याबद्दल धन्यवाद !! अशी प्रतिक्रिया देशराजने दिली आहे. या व्हिडिओला 108k पेक्षा जास्त लाइक्स आणि खूप जास्त प्रतिक्रियासुद्धा मिळाल्या आहेत.