Mumbai : ‘बेस्ट’चे चलो ॲप चालतं कसं? पाहा संपूर्ण प्रोसेस
बेस्टने मोबाईलमध्ये चलो ॲपवरील तिकीटाला परवानगी दिली आहे. प्रवाशांनी ऑनलाईन काढलेले तिकीट हे मोबाईलमध्येच दिसेल तसेच तुम्ही आता पासदेखील काढू शकता.

Mumbai : बेस्टच्या प्रवाशांसाठी आता आनंदाची बातमी आहे. चलो ॲपवर आता प्रवाशांना ऑनलाईन बेस्टचे तिकिट काढता येणार आहे. पहिलाही प्रवाशी ऑनलाईन तिकीट काढत होते पण त्यांना कागदी प्रत दाखवावी लागत होती आणि तसेच मोबाईल मधील तिकिट दाखवलेले ग्राह्य धरण्यात येत नव्हते.
पण आता बेस्टने मोबाईलमध्ये चलो ॲपवरील तिकीटाला परवानगी दिली आहे. प्रवाशांनी ऑनलाईन काढलेले तिकीट हे मोबाईलमध्येच दिसेल तसेच तुम्ही आता पासदेखील काढू शकता. तसेच आता बस कुठे आहे, किती वेळेत बस स्टॉपला येईल हे सुद्धा तुम्हाला या ॲपद्वारे कळेल. तसेच बसमध्ये गर्दी आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला समजणार आहे.
तर जाणून घेऊयात नक्की चलो अप वरून तुम्ही बेस्टचे तिकीट कसे काढून घेऊ शकता ते :-
1. तुम्हाला गूगल प्ले स्टोर वरून चलो ॲप डाउनलोड/इन्स्टॉल करावा लागेल.
2. त्यानंतर त्यावर तुम्हाला तुमची भाषा निवडायची आहे.
3. नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून, आलेला otp टाकून, नंतर तुमचे नाव टाकून रजिस्ट्रेशन करायचे आहे.
4. नंतर तुम्हाला तुमचा रूट, कोणत्या बस स्टॉप पासून ते कोणत्या बस स्टॉपपर्यंत जायचे आहे ते बस स्टॉप सिलेक्ट करायचे आहे.
5. आणि किती लोकांसाठी तिकीट पाहीजेल ते सिलेक्ट करून तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचे आहे.
असेच तुम्ही बेस्टचा पासदेखील काढू शकता. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी, वृद्ध नागरिकांसाठी, अपंग, दिव्यांग, पत्रकार असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ते तुम्ही सिलेक्ट करून ऑनलाईन पेमेंट करून पास काढू शकता.
प्रवास करताना तुम्हाला तुमच्या मोबाईल स्क्रीनवरील तिकीट किंवा पास वाहकाला दाखवणे आवश्यक आहे. वाहकाकडून त्याची नोंदणी वाहक यंत्रात नोंदविण्यात येईल.