आपलं शहर

Mumbai Bridge : पश्चिम उपनगरात होणार वाहतूक कोंडी ! जाणून घ्या त्याचे कारण

पश्चिम उपनगरातील अनेक पुलांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे महानगरपालिकेने सहा मोठ्या पुलांची दुरुस्ती आणि सहा पुलांची पुनर्बांधणी करायचे ठरवले आहे. भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पालिकेने हा विचार केला आहे.

Mumbai Bridge : पश्चिम उपनगरातील अनेक पुलांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे महानगरपालिकेने सहा मोठ्या पुलांची दुरुस्ती आणि सहा पुलांची पुनर्बांधणी करायचे ठरवले आहे. भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पालिकेने हा विचार केला आहे.

तसेच या तिन्ही प्रशासकीय विभागातील एकूण 14 पुलांच्या कामासाठी तब्बल 17.75 कोटी रुपयेचा निधी मंजूर करण्यात येणार आहे. आधीच मुंबईत वाहतूककोंडी निर्माण होत आहे आणि त्याचे कारण म्हणजे तब्बल 18 पुलांचे बांधकाम आणि दुरुस्ती. आता त्यात आणखीन 6 पुलांची भर पडणार आहे.

तिन्ही प्रशासकीय म्हणजेच पश्चिम उपनगरातील परिमंडळ तीन आणि चारमधील वाहतूक पूल, पादचारी पूल तसेच महापालिका हद्दीतील पूल यांची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर 4 वाहतुकीचे आणि 2 पादचारी अशा 6 पुलांची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करण्यात येणार आहे. तर 2 वाहतूक आणि 6 पादचारी अशा एकूण 8 पुलांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.

या कामासाठी स्वस्तिक कन्स्ट्रक्शन कंपनीने महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा 22.4 टक्के कमी दर आकरले आहे. या सर्व दुरुस्ती आणि पुनर्बांधणीच्या कामासाठी 17 कोटी 75 लाख 46 हजार 352 रुपयांचे विविध करांसह कंत्राट निश्चित केले आहे. तसेच यामध्ये तांत्रिक सल्लागार शुल्क 33 लाख 32 हजार रुपये टेक्नोजेम कंसल्टंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात येणार आले. तसेच फेर तपासणी सल्लागार शुल्क 9 लाख 33 हजार देण्यात येणार आहे.

कोणत्या पुलांची होणार पुनर्बांधणी :-
• के/ पश्चिम विभागातील कासम नगर येथे पादचारी पूलाची पुनर्बांधणी.

• पी उत्तरमधील कुरार व्हिलेज, गांधीनगर येथील वाहतूक पूलाची पुनर्बांधणी

• पी/उत्तर विभागातील पुष्पा पार्क येथील पादचारी पूलाची पुनर्बांधणी,

• गोरेगांव (पू) येथे उत्तरेकडील रेल्वे पादचारी पुलाचे महानगरपालिका हद्दीमध्ये विस्तारीकरण.

• पी/उत्तर विभागातील भूखंड क्र.१३ आणि ४ कलेक्टर कंपाऊंड, मालवणीमधील विद्यमान पादचारी पूलाची पुनर्बाधणी,

• पी/उत्तर विभागातील मदर तेरेसा शाळेजवळ, कलेक्टर कंपाउंड, येथील विद्यमान पादचारी पूलाची पुनर्बांधणी.

• पी/उत्तर विभागातील प्लॉट क्र. २५ आणि ८ बी, कलेक्टर कंपाउंड, मालवणी विद्यमान वाहन पूलाची पुनर्बांधणी.

• पी/दक्षिण विभागातील संतोष नगर, गोरेगाव पूर्व येथील पादचारी पुलाची पुनर्बांधणी.

कोणत्या पुलांची होणार मोठ्या स्वरूपात दुरुस्ती:-
• के / पूर्व विभागातील मिठी नदीवरील अंधेरी कुर्ला रस्त्यावरील वाहतूक पूल

• के/पश्चिम विभागातील लोखंडवाला कॉम्प्लेक्स व लक्ष्मी इस्टेट यांना जोडणारा वाहतूक पूल

• पी/उत्तर विभागातील अथर्व महाविद्यालय येथील हिंदूस्थान नाला मालाड चारकोप रस्त्यावरील वाहतूक पूल.

• पी/उत्तर विभागातील लालजीपाडा वलनई पोईसर नदी व लिंक रोड पोईसर नदीवरील वाहतूक पूल.

• मालाड (पूर्व) कुरार व्हिलेज येथील अनुराधा जनरल स्टोअर येथील पादचारी पूल

• मालाड (पूर्व) कुरार व्हिलेज येथील गोकूळ नगर व आनंदनगर यांना जोडणारा पादचारी पूल.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments