बीएमसी

Mumbai Budget 2022 : मुंबईकरांसाठी आर्थिक संकल्पात ‘या’ महत्त्वाच्या दहा गोष्टी…

यंदाच्या अर्थसंकल्पात नागरी सेवा सुविधा , पायाभूत सुविधा आणि विविध प्रकल्पांवरदेखील भर दिला गेला.

3 फेब्रुवारी रोजी मुंबई महानगर पालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. मुंबई पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी सकाळी 11 वाजता स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधवांकडे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर केले. तसेच सकाळी 10 वाजता अतिरिक्त पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोषींकडे शैक्षणिक अंदाजपत्रक सादर केला. (Mumbai Budget 2022: Ten important things in the financial resolution for Mumbaikars …)

यंदाच्या अर्थसंकल्पात नागरी सेवा सुविधा , पायाभूत सुविधा आणि विविध प्रकल्पांवरदेखील भर दिला गेला. 2022- 23 अर्थसंकल्प मुंबईसाठी अतिशय महत्त्वाचे होते. कारण यंदाचे बजेट मुंबईच्या इतिहासातील सर्वांत मोठे बजेट होते. त्यात मोठ्या आणि महत्वाच्या घोषणाहि करण्यात आल्या.

जाणुन घेऊया 2022-23 अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या गोष्टी

  1. मुंबई महानगरपालिकेचा 2022-23 चा अर्थसंकल्प 45,949 हजार कोटींचा आहे. गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प 39,038 हजार कोटींचा होता. मागील वर्षाचा अर्थसंकल्प बघता यंदाच्या वर्षी 17.70% ने वाढ झाली आहे.
  2. मुंबईकरांचे आरोग्य लक्षात ठेवून 200 शिवयोग केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. या योजनेचे नाव ‘ शिवयोग केंद्र’ असे ठेवण्यात आले आहे. हे नामकरण मुंबईत करण्यात आले असून योजनेसाठी 30 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
  3. मुंबईत कचरा निर्माण करणाऱ्यांसाठी नवे नियम लागू झाले आहे. कचरा निर्माण करणाऱ्या मुंबईतील 3500 उपहारगृहांना कचऱ्याकरता वापरकर्ता शुल्क भरावं लागणार आहे.
  4. मुंबईतील पार्किंगचा प्रश्न सोडवण्याकरता मुंबई पार्किंग अँथॉरिटी नेमण्यात येणार आहे. जेणेकरून मुंबईकरांना पार्किंग करताना होणारा त्रास मिटणार आहे. पार्किंग सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ऑनलाईन पार्किंग बुकिंगची सुविधा देणारे मुंबई भारतातले पहिले शहर ठरले.
  5. पालिकेचं शिक्षण बजेट 3,370 कोटींचे असणार आहे. केंद्रित विद्यापीठाशी संलग्नित आयजीएससी आणि आयबी शाळांची उभारणी होणार आहे. नव्या दोन शाळांकरीता 15 कोटींची तरतूद असणार आहे.
  6. 10वीच्या 19,401 विद्यार्थ्यांना टॅब वाटण्यात येणार असून त्यासाठी 7 कोटींची तरतूद राखीव ठेवण्यात आली आहे. डिजीटल शिक्षणासाठी 27 कोटींची तरतूद केली आहे.
  7. शाळांची स्वच्छता तसेच देखभालीसाठी तब्बल 75 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची अकलन क्षमता वाढवण्यासाठी शाळेत बोलक्या संरक्षक भिंती निर्माण करण्यात येणार आहेत.
  8. मुलींच्या भत्ता पुरवठ्याची एकूण तरतूद 7 कोटी 47 लाख आहे. सर्व विद्यार्थ्यांना बसचा मोफत प्रवास मिळावा म्हणून अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आली आहे.
  9. बेस्टच्या उपक्रमणसाठी 800 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून कोस्टल रोड उपक्रमासाठी 3200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात कोणतीही थेट करवाढ केलेली नाही.
  10. यंदाच्या अर्थसंकल्पात कोणत्याही नव्या घोषणा करण्यात आल्या नसून, आहे त्या योजना सुरळीत ठेवण्यावर आणि मुंबईकरांच्या आरोग्यावर आणि शिक्षणावर प्रामुख्याने भर दिला गेला आहे.

हे हि वाचा:

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments