लोकल

Mumbai Central Local : मुंबईच्या लोकल राणीची 97 वर्षे पूर्ण; 1995 पासून असा होत गेला बदल

तेव्हाच्या व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजेच आताच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून कुर्ल्यापर्यंत पहिली लोकल सेवा चालली होती.

Mumbai Central Local : भारतीय रेल्वेमध्ये सुरु असलेल्या विद्युत गाड्यांच्या नव्या युगाला 96 वर्षे पूर्ण झाली. 3 फेब्रुवारी 1925 ला पहिली विजेवर धावणारी लोकल मुंबईत धावली होती. तेव्हाच्या व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजेच आताच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून कुर्ल्यापर्यंत पहिली लोकल सेवा चालली होती. त्याला 04 फेब्रुवारी रोजी 97 वर्षे पूर्ण झाली.

इलेक्ट्रिक मल्टिपल युनिटच्या (EMU) मुंबई लोकलने मध्य रेल्वेवर 97 वर्षे पूर्ण केली आहेत. 3 फेब्रुवारी 1925 रोजी, 4-कार असलेली पहिली EMU सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला यांच्यात धावली होती. मध्ये रेल्वे आजघडीला 4 मार्गांवर सेवा पुरवत आहे, ते मार्ग म्हणजे मुख्य मध्य लाईन, हार्बर लाईन, ट्रान्सहार्बर लाईन आणि कॉरिडॉर लाईन (नेरुळ/बेलापूर-खारकोपर) या मार्गांवर रेल्वेसेवा सुरु केली.

मध्य रेल्वेचा आतापर्यंतचा इतिहास

1925 – हार्बर मार्गावर 4 डब्यांची लोकल

1927 – मुख्य आणि हार्बर मार्गावर 8 डब्यांची लोकल

1963 – मुख्य आणि हार्बर मार्गावर 9 डब्यांची लोकल

1986 – मुख्य मार्गावर 12 डब्यांची लोकल

1987 – कर्जतच्या दिशेने 12 डब्यांची लोकल

2008 – कसारा दिशेने 12 डब्यांची लोकल

2010 – ट्रान्सहार्बर लाईनवर 12 डब्यांची लोकल

2011 – सर्व मेन लाइन सेवा 12 डब्यांची लोकल

2012 – मेन लाईनवर 15 डब्यांची लोकल

2016 – हार्बर मार्गावर सर्व 12 डब्यांची लोकल

2020 – मुख्य मार्गावर एसी लोकल

2021 – हार्बर मार्गावर एसी लोकल

वर्षानुवर्षे आपल्या सेवेत अपडेट करत प्रवाशांना दिलासा देणारी लोकल आज 97 वर्षांची झालेली आहे.

आता मध्य मार्गावर रेल्वेच्या किती फेऱ्या होतात, तेही समजून घेऊ.

1925 – दररोज 150 लोकल फेऱ्या

1935 – दररोज 330 लोकल फेऱ्या

1945 – दररोज 485 लोकल फेऱ्या

1951 – दररोज 519 लोकल फेऱ्या

1961 – दररोज 553 लोकल फेऱ्या

1971 – दररोज 586 लोकल फेऱ्या

1981 – दररोज 703 लोकल फेऱ्या

1991 – दररोज 1015 लोकल फेऱ्या

2001 – दररोज 1086 लोकल फेऱ्या

2011 – दररोज 1573 लोकल फेऱ्या

2018 – दररोज 1732 लोकल फेऱ्या

2020 – दररोज 1774 लोकल फेऱ्या

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments