आपलं शहर

Mumbai Corona News : मुंबईत नाही एकही कंटेंन्मेंट झोन; मुंबई झाली ‘कंटेंन्मेंट- फ्री’…

9 फेब्रुवारीला मुंबईतील गोवंडी परिसरातील M/E वॉर्ड मध्ये स्थित असलेली फक्त एक इमारत सील होती.

गेल्या 2 वर्षापासून मुंबईत कोरोनाने प्रचंड हाहाकार माजवला होता. त्यात अनेक जण कोरोनाने ग्रासले होते. अनेकांचा मृत्यूही झाला आणि अनेक ठिकाणांना आणि इमारतींना कंटेंमेंट झोन घोषित करून सील करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, 10 फेब्रुवारी रोजी मुंबईत एकही सील ईमारत आणि कंटेंन्मेंट झोन नव्हते. 2020 पासून मुंबईत कंटेंन्मेंट झोन बनण्यास सुरुवात झाली. BMCच्या सर्वेकक्षणानुसार, मुंबईची 50% लोकसंख्या कंटेंन्मेंट झोनमध्ये राहत होती. 2022 जानेवारीच्या मध्यापासून कंटेंन्मेंट झोनची संख्या घटण्यास सुरुवात झाली आणि काल फेब्रुवारीच्या 10 तारखेला ती 0 वर येऊन पोहचली. (Mumbai Corona News : No Entertainment Zone in Mumbai; Mumbai has become ‘entertainment-free’ … )

पाहिल्या लाटेत मुंबईतील धारावीसह अनेक झोपडपट्टीभागांना कोरोनाचा सामना करावा लागला होता. पण दुसऱ्या लाटेत चित्र थोडेसे वेगळे होते. दुसऱ्या लाटेत सर्वात जास्त सामना झोपडपट्टीपेक्षा इमारतींना करावा लागला. मुंबईतील अनेक ईमारती सील करण्यात आल्या. तिसऱ्या लाटेत कोरोना प्रादुर्भाव असलेल्या इमारतीतील मजलेदेखील बंद करण्यात आले.

9 फेब्रुवारीला मुंबईतील गोवंडी परिसरातील M/E वॉर्ड मध्ये स्थित असलेली फक्त एक इमारत सील होती. कोरोना प्रादुर्भावाचे लक्षण दिसत नसल्याने हे सील हटवण्यात आले. सध्या पूर्ण मुंबईत एकही कंटेंन्मेंट झोन आणि सील केलेली ईमारत नाही आहे. बीएमसीने जारी केलेल्या आकडेवारीच्या आधारे, 10 फेब्रुवारी रोजी पूर्ण मुंबईत 429 नवीन कोविड -19 प्रकरणे नोंदवली गेली. मुंबईत 3,698 सक्रिय कोरोनाव्हायरस रुग्ण आहेत.

हे हि वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments