बीएमसी

Mumbai Corona Update : फेब्रुवारीच्या शेवटी मुंबई होणार अनलॉक; अनेक गोष्टींमध्ये मिळणार सूट

जरी फेब्रुवारी अखेरीस मुंबई पूर्णपणे अनलॉक होणार असली तरीही सर्व कोविड नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहेत.

2019च्या उत्तरार्धात कोरोना व्हायरसने भारतात पाऊल ठेवले. हातातील कामे सुटून दोन वेळच्या भाकरीचा प्रश्न उद्भवल्याने अनेक मुंबईकर पायी-पायी आपआपल्या गावी परतू लागले. त्यात मुंबईला नवीन ओळख मिळाली ती म्हणजे भारतातील सर्वात जास्त कोरोना रूग्णसंख्या असणारे शहर म्हणजे मुंबई! वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर उद्याने बंद पडले. समुद्र किनारे बंद पडले. थिएटर, नाट्यगृह, मुलांच्या शाळा , महाविद्यालये त्यासह बागेतील रहदारी आणि मुलांचे खेळणे-बागडणे सुध्दा! बघता-बघता पूर्ण आर्थिक राजधानीच ठप्प झाली. याचा फटका सामन्य मुंबईकराला तर बसलाच पण देशाचे आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणावर झाले. ( Mumbai Corona Update : Mumbai to be unlocked by end of February;  Discounts in many things )

परंतु, कालची आलेली बातमी पूर्ण भारतासाठी आनंदाची आहे, कारण काल दिनांक 7 फेब्रुवारी रोजी मुंबई शहरात एकूण 356 नवीन रूग्ण आढळले आणि मुख्य बाब म्हणजे ही संख्या 21 डिसेंबर 2021 नंतरची सर्वात कमी दैनिक रूग्णसंख्या आहे. कोरोनाच्या तीन लाटांना मुंबई यशस्वीपणे सामोरे जात आहे. हे या संख्येवरून लक्षात येत आहे. मुंबईतील सोमवारची मृत्य संख्या 5 होती.

मुंबईतील कोरोनाचा दर मंदावल्याने मुंबई महानगरपालिकेचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांना खुशखबर दिली आहे की,”देशभरातील कोविड-19च्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होताना दिसत असल्याने मुंबईचे कोरोना निर्बंध फेब्रुवारीच्या महिण्याखेरीस शिथिल करण्यात येतील. तरीही मास्क घालने आणि इतर कोविड प्रोटोकॉल पाळणे बंधनकारक असणार आहे.”

1 फेब्रुवारीपासून मुंबईतील नाईट कर्फ्यु हटवण्यात आला होता. रेस्टॉरंट आणि थिएटर 50 टक्केने खोलण्यास परवानगी देण्यात आली होती. बाग-बगीचे, उद्यानेदेखील 50 टक्क्यांनी पुन्हा खोलण्यात आले. मुंबईतील स्विमिंग पूल आणि वॉटर पार्कला समान क्षमतेत सुरू करण्याची परवानगी मिळाली. स्थानिक बाजार आणि पर्यटन स्थळे त्यांच्या वेळेनुसारच सुरू राहतील.

जरी फेब्रुवारी अखेरीस मुंबई पूर्णपणे अनलॉक होणार असली तरीही सर्व कोविड नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहेत.

हे हि वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments