बीएमसी

मुंबईकरांची कोरोनावर मात, मुंबईत फक्त एकच इमारत सील

मुंबईत 21 डिसेंबर 2021 पासून तिसऱ्या लाटेचा प्रसार सुरु झाला. या काळात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत एका दिवसात 20 हजार बाधित रुग्ण आढळून येऊ लागले.

Mumbai Corona Update : मुंबईत 21 डिसेंबर 2021 पासून तिसऱ्या लाटेचा प्रसार सुरु झाला. या काळात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत एका दिवसात 20 हजार बाधित रुग्ण आढळून येऊ लागले. यामुळे बाधित इमारतींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने पालिकेने नियमात सुधारणा केली. त्यानुसार 20 टक्के घरांमध्ये किंवा किमान 10 रुग्ण असल्यास इमारती सील करण्यास सुरुवात केली. परिणामी, सील इमारतींचा आकडा कमी होत गेला.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रसारही आता पूर्णपणे नियंत्रणात आल्याचे चित्र आहे. दररोजच्या बाधित रुग्णांची संख्या साडेतीनशेवर आली आहे. सोमवारची रुग्णसंख्या 356 आहे, परिणामी मुंबईतील चाळी – झोपडपट्टी पाठोपाठ आता इमरतीही कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहेत. सध्या मुंबईत केवळ एक इमारत प्रतिबंधित आहे. यामुळे पुन्हा मुंबईकरांनी कोरोनावर मात केली आहे.

मुंबईत आता रुग्ण वाढीचा दैनंदिन सरासरी दर 0.09 टक्के आहे. तर एक हजार 407 रुग्णच रुग्णालयात उपचार घेत आहेत. होम क्वारंटाईन रुग्णांची संख्या 60 हजारच्या घरात आहे. त्यामुळे इमारत प्रतिबंधित होण्याचे प्रमाण कमी होत आता केवळ गोवंडी विभागात एक इमारत प्रतिबंधित आहे. तर आतापर्यंत दोन वर्षांच्या कालावधी तब्बल 66 हजार 335 इमारती नियमातून मुक्त झाल्या आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments