क्राईम

Mumbai Crime News : मुलुंडमध्ये 70 लाखांची लूट, पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश…

मुंबई पोलिसांनी मोनूसह नीलेश भगवान सुर्वे (24), नीलेश मंगेश चव्हाण (34), मनोज गणपत कलां (32), वसीउल्लाह किताबुल्ला चौधरी (43), दिलीप शिवशंकर सिंह (23), रत्नेश उर्फ गगन अनिलकुमार सिंह (25) यांना अटक केली आहे.

देशाच्या कानाकोपऱ्यातून एक टोळी एकत्र येऊन अनेक ठिकाणी लुट करत होती. मुख्य म्हणजे, या टोळीने मुंबईतील मुलुंडमध्ये स्थित असलेल्या वी पी इंटरप्राईजेजमध्येसुध्दा 70 लाख रुपयांची लूट केली. या प्रकरणातील 8 जणांना सोमवारी दिनांक 7 फेब्रुवारी रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली. ( Mumbai Crime News: 70 lakh robbery in Mulund, gang busted by police … )

अटक केलेल्या आरोपींकडून 37 लाखांची जप्ती करण्यात आली असून, 4 पिस्तूल, 27 काडतूस आणि 3 मोटार गाड्यांना जप्त केले गेले आहे. यातील 1 गाडी आरोपी लुटपात करण्यासाठी वापर होते. आरोपींच्या टोळीतील गुन्हेगार देशाच्या वेगवेगळ्या राज्यातून आहेत. या प्रकरणामागचा मास्टरमाइंड राजेंद्र प्रसाद सिंह उर्फ मोनु आहे, जो उत्तर प्रदेशचा निवासी आहे. मुंबई पोलिसांनी मोनूसह नीलेश भगवान सुर्वे (24), नीलेश मंगेश चव्हाण (34), मनोज गणपत कलां (32), वसीउल्लाह किताबुल्ला चौधरी (43), दिलीप शिवशंकर सिंह (23), रत्नेश उर्फ गगन अनिलकुमार सिंह (25) यांना अटक केली आहे.

पोलिसांच्या मते मोनू या प्रकरणामागचा मास्टरमाईंड आहे. या प्रकरणात गाडी आणि हत्यारे पुरवण्याचे काम मुख्य आरोपी मोनु करत होता. लूट केल्यानंतर आरोपी कपडे आणि गाड्यांचे नंबर प्लेट्स बदलत होते. अखेर या 8 आरोपींना पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे.

हे हि वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments