स्पोर्ट

मुंबई इंडियन्सची संपूर्ण गँग; कोणत्या खेळाडूला किती रुपयांनी घेतलं विकत…

लिलावाच्या दुसऱ्या दिवशीही MI ने जास्त गडबड केली नाही. आणि तब्बल 2 तासांनंतर पहिला खेळाडू म्हणून जयदेव उनाडकटला आपल्याकडे घेतलं.

Mumbai Indians Full Squad : आयपीएलचा (IPL 2022) सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) पुन्हा एकदा त्यांचा कर्णधार रोहित शर्मासोबत (Rohit Sharma) खेळण्यास तयार झाली आहे. लिलावाच्या पहिल्या दिवशी, शनिवारी खूप कमी खेळाडूंना आपल्याकडे घेतलं. लिलावाच्या दुसऱ्या दिवशीही MI ने जास्त गडबड केली नाही. आणि तब्बल 2 तासांनंतर पहिला खेळाडू म्हणून जयदेव उनाडकटला आपल्याकडे घेतलं. दुसऱ्या दिवसातील त्यांची सर्वात मोठी बोली जोफ्रा आर्चरसाठी होती, आर्चरसाठी MI ला तब्बल 8 कोटी रुपये मोजावे लागले. (Mumbai Indians full squad IPL Auction 2022 Day 2 LIVE)

मुंबई इंडियन्सने हे खेळाडू ठेवले कायम

रोहित शर्मा (16 कोटी)

जसप्रीत बुमराह (12 कोटी)

सूर्यकुमार यादव (8 कोटी)

किरॉन पोलार्ड (6 कोटी)

मुंबई इंडियन्सने हे खेळाडू घेतले विकत :

ईशान किशन – 15.25 कोटी (मूळ किंमत – 2 कोटी)

डेवाल्ड ब्रेविस – 3 कोटी (मूळ किंमत – 20 लाख)

तुळस थंपी – 30 लाख (मूळ किंमत – 30 लाख)

मुरुगन अश्विन – 1.60 कोटी (मूळ किंमत – 20 लाख)

जयदेव उनटकट 1.30 कोटी (मूळ किंमत – 75 लाख)

मयंक मार्कण्‍य – 65 लाख (मूळ किंमत – 20 लाख)

एन. टिळक वर्मा – 1.70 कोटी (मूळ किंमत – 20 लाख)

संजय यादव – 50 लाख (मूळ किंमत – 20 लाख)

जोफ्रा आर्चर – 8 कोटी (मूळ किंमत – 2 कोटी)

डॅनियल सॅम्स – 2.60 कोटी

टायमल मिल्स – 1.50 कोटी

टीम डेव्हिड – 8.25 कोटी (मूळ किंमत – 40 लाख)

रिले मेरेडिथ 1 कोटी – मूळ किंमत – 1 कोटी

मुंबई इंडियन्सकडून सगळ्यात आधी ईशान किशनसाठी (15.25 कोटींची) सुरुवात केली. इशान यापूर्वीही मुंबईकडूनच खेळत होता. पंजाब किंग्ज (PBKS) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांनी इशानला घेण्याचा प्रयत्न केला, मात्र मुंबईने वाढवलेल्या बोलीसमोर दोन्ही संघ व्यवस्थापकांनी त्याला घेणं टाळलं.

23 वर्षीय इशान किशन आता या लीगमधील दुसरा सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे. युवराज सिंग (16 कोटी) नंतर तो सर्वात महागडा आहे. या लीगमधील सर्वात महागडा खेळाडू होण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिसच्या नावावर असला तरी त्याला यापूर्वी 16.25 कोटी रुपये मिळाले आहेत. अत्यंत सावधपणे खेळाडूंची खरेदी करणाऱ्या मुंबईने पहिल्या दिवशी तब्बल 7 तास उलटल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेव्हिसच्या रूपाने दिवसातील दुसरा खेळाडू विकत घेतला.

IPL लीगमध्ये सर्वाधिक 5 विजेतेपदे जिंकणारा MI हा एकमेव संघ आहे. MI ला पहिल्या 5 हंगामात एकही विजेतेपद मिळवता आले नाही, मात्र 2013 नंतर सलग 5 विजेतेपदावर MI ने नाव कोरलं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments