स्पोर्ट

Video : मुंबई इंडियन्सने शेअर व्हिडीओ, पोलार्ड आणि सचिनची मस्ती, इशानने घेतली धास्ती

मुंबई इंडियन्सने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये इशान किशन सचिन तेंडुलकरला बघताच वेगळे हावभाव करू लागतो आणि हे पाहून किरॉन पोलार्डही खळखळून हसायला लागतो.

Mumbai Indians Video : सचिन तेंडुलकर अचानकपणे त्यांच्या चेंजिंग रुममध्ये गेला आणि तिथे असलेल्या इशानला काही समजेनासे झालं. मुंबई इंडियन्सने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये इशान किशन सचिन तेंडुलकरला बघताच वेगळे हावभाव करू लागतो आणि हे पाहून किरॉन पोलार्डही खळखळून हसायला लागतो.

भारतीय फलंदाज इशान किशन सध्या सतत चर्चेत असतो. IPL मेगा लिलावात सर्वात महागडा विक्री झाल्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या T20 मध्ये इशान त्याच्या संथ फलंदाजीसाठी चर्चेत होता. दरम्यान, गुरुवारी मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये इशान किशनचे वेगवेगळे हावभाव करताना दिसतो आहे.

IPL फ्रँचायझीने मेगा लिलावात इशान किशनवर 15.25 कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लागली आहे. तेव्हाच मुंबईने आपल्या इंस्टाग्राम पोस्ट केलेल्या व्हिडीओचे कॅप्शनही छान लिहलं आहे. तुमच्या संघातील एक मजेदार व्यक्ती अचानक त्याच्या वरीष्ठांना पाहतो, तेव्हा… तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की हा व्हिडीओ आताच नाही, तर थ्रोबॅक व्हिडिओ आहे.

कॅप्शनमध्ये फॉलोअर्ससाठीही एक प्रश्न दिला आहे, तो म्हणजे जेव्हा सचिन तेंडुलकर अचानक तुमच्यासमोर येईल तेव्हा तुमची प्रतिक्रिया कशी असेल? कदाचित, इशान किशनदेखील या कॅप्शननुसार व्हिडिओमध्ये हावभाव करत असेल, तोच क्षण ज्याचा प्रश्न मुंबई इंडियन्सने लिहिला आहे. इशानचे हावभाव पाहिल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये उपस्थित असलेले इतर सर्व क्रिकेटपटू जोरजोरात हसायला लागतात.

संपूर्ण टीम :

रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, किरॉन पोलार्ड, इशान किशन, देवाल्ड ब्रेविस, बेसिल थंपी, मुरुगन अश्विन, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, एन. तिलक वर्मा, संजय यादव, जोफ्रा. आर्चर, डॅनियल सॅम्स, टायमल मिल्स, टिम डेव्हिड, रिले मेरेडिथ, अर्शद खान, अनमोलप्रीत सिंग, रमणदीप सिंग, राहुल बुद्धी, हृतिक शोकीन, अर्जुन तेंडुलकर, आर्यन जुयाल, फॅबियन अॅलन,

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments