आपलं शहरलोकल

Mumbai Local MegaBlock : 72 तासांच्या मेगाब्लॉकमुळे किती ट्रेन बंद होणार ? तुमच्यावर काय परिणाम होणार ?

ठाणे आणि दिवा यादरम्यान रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम सुरु आहे. यामुळे 4 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते 7 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या जम्बो मेगाब्लॉकमुळे 350 लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

ठाणे आणि दिवा यादरम्यान रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम सुरु आहे. यामुळे 4 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते 7 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या जम्बो मेगाब्लॉकमुळे 350 लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर 100 हून अधिक मेल एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती सेंट्रल रेल्वेने दिली आहे, यामुळे सेंट्रल लाईनवर 72 तासांचा मेगाब्लॉक असल्याची माहिती सेंट्रल रेल्वेने विभागाने दिली आहे.

बहुप्रतिक्षित पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकेच्या कामासाठी हा जम्बो मेगाब्लॉक असणार आहे. यामुळे ठाणे ते दिवा यादरम्यान हा जम्बो मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेवरील पाचवी आणि सहावी मार्गिका खुली झाल्यास लोकलच्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. यापूर्वीसुद्धा याच रेल्वे लाईनवर जानेवारी महिन्यात सेंट्रल रेल्वेने 14 तासांचा मेगा ब्लॉक ठेवला होता.

रद्द झालेल्या गाड्यांची यादी :-

22119/22120 मुंबई-करमाळी-मुंबई एक्सप्रेस

12051/12052 मुंबई – मडगाव – मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस – 5 फेब्रुवारी, 6 फेब्रुवारी आणि 7 फेब्रुवारी रोजी रद्द राहील

11085 लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव एक्सप्रेस – 7 फेब्रुवारी

11086 मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस – 8 फेब्रुवारी

11099 लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव एक्सप्रेस – 5 फेब्रुवारी

11100 मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस – 6 फेब्रुवारी

22113 लोकमान्य टिळक टर्मिनस – कोचुवेली एक्सप्रेस – 5 फेब्रुवारी

22114 कोचुवेली – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस – 7 फेब्रुवारी

12224 एर्नाकुलम – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस – 2 फेब्रुवारी आणि 6 फेब्रुवारी

12223 लोकमान्य टिळक टर्मिनस – एर्नाकुलम एक्सप्रेस – 5 फेब्रुवारी आणि 8 फेब्रुवारी

12220 सिकंदराबाद – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस – 4 फेब्रुवारी

12219 लोकमान्य टिळक टर्मिनस – 5 फेब्रुवारी रोजी सिकंदराबाद एक्सप्रेस

12133/12134 मुंबई – मंगळुरू जंक्शन- मुंबई एक्सप्रेस – 4 फेब्रुवारी, 5 फेब्रुवारी, 6 फेब्रुवारी आणि 7 फेब्रुवारी

17317 हुबळी-दादर एक्सप्रेस – 4 फेब्रुवारी, 5 फेब्रुवारी आणि 6 फेब्रुवारी

17318 दादर-हुबळी एक्सप्रेस – 5 फेब्रुवारी, 6 फेब्रुवारी आणि 7 फेब्रुवारी

11008 पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस – 4 फेब्रुवारी, 5 फेब्रुवारी, 6 फेब्रुवारी आणि 7 फेब्रुवारी

11007 मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस जेसीओ 5 फेब्रुवारी, 6 फेब्रुवारी, 7 फेब्रुवारी आणि 8 फेब्रुवारी

11030 कोल्हापूर-मुंबई कोयना एक्सप्रेस – 4 फेब्रुवारी, 5 फेब्रुवारी आणि 6 फेब्रुवारी

11029 मुंबई – कोल्हापूर कोयना एक्सप्रेस – 5 फेब्रुवारी, 6 फेब्रुवारी आणि 7 फेब्रुवारी

12071 मुंबई-जालना-मुंबई जन शताब्दी एक्सप्रेस – 5 फेब्रुवारी व 6 फेब्रुवारी

12109/12110 मुंबई-मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेस – 5 फेब्रुवारी आणि 6 फेब्रुवारी

11401/11402 मुंबई – आदिलाबाद – मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस – 4 फेब्रुवारी, 5 फेब्रुवारी आणि 6 फेब्रुवारी

12123 मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन क्वीन एक्सप्रेस – 5 फेब्रुवारी, ६ फेब्रुवारी आणि ७ फेब्रुवारी

12112 अमरावती-मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस – 4 फेब्रुवारी व 5 ​​फेब्रुवारी

12111 मुंबई – अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस – 5 फेब्रुवारी आणि 6 फेब्रुवारी

12140 नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस – 4 फेब्रुवारी व 5 ​​फेब्रुवारी

12139 मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस 5 फेब्रुवारी आणि 6 फेब्रुवारी

या  व्यतिरिक्त अजून महत्त्वाच्या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत, ट्रेन विभागाच्या सांकेतिक स्थळावर जाऊन तुम्हाला या संदर्भातील माहिती मिळेल.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments