लोकल

Mumbai Local Update : लोकलमध्ये पाहायला मिळणार ‘ऑडियो-व्हिडियो’ रेकॉर्डिंग सिस्टीम ; जाणुन घ्या नक्की काय असते हे?…

हे उपकरण एक ऑडियो-व्हिडिओ रेकॉर्डिंग उपकरण आहे. या उपकरणामूळे लोकलमध्ये झालेल्या आंतरिक किंवा बाहेरील अपघाताचा तपास करणे सोपे होणार आहे.

मुंबईच्या लोकलमध्ये होणाऱ्या अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासन लोकलमध्ये विमानांसाठी वापरात असलेले ‘ ब्लॅक बॉक्स ‘ बसवण्यात येणार आहे. यासाठी अर्थ मंत्रालयाने अडीच कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हे उपकरण मोटरमॅनच्या केबिनमध्ये बसवण्यात येणार आहे. लोकलच्या बाहेरील बाजूस सीसीटीव्ही कॅमेरेदेखील बसवण्यात येणार आहेत. ( Mumbai Local Update: Audio-video recording system available locally; Find out exactly what it is?… )

हे उपकरण एक ऑडियो-व्हिडिओ रेकॉर्डिंग उपकरण आहे. या उपकरणामूळे लोकलमध्ये झालेल्या आंतरिक किंवा बाहेरील अपघाताचा तपास करणे सोपे होणार आहे. तसेच या उपकरणामुळे लोकलमध्ये आणि मोटारमॅन तसेच गार्ड्स यांवर लक्ष ठेवणे सुलभ होणार आहे.

या उपक्रमात मुंबई लोकल रेल्वेतील मध्य आणि पश्चिम मार्गाचा समावेश आहे. एकूण 226 लोकलमध्ये सिस्टम बसवण्यात येणार आहे. यात मुख्यतः पश्चिम मार्गांवरील 113 लोकलचा समावेश आहे. या उपकरणाने सिग्नलयंत्रणेवर लक्ष ठेवण्यासही खूप मदत होणार आहे. या सगळ्यासाठी रेल्वेकडे केंद्रीय डेटाबेस असेल.

या उपकरणात 2 TB पर्यंत स्टोअरज उपलब्ध असणार आहे. 90 दिवसापर्यंत साठवण क्षमता असणारे हे उपकरण वर्षाअखेरीस सर्व लोकलमध्ये अंगभूत केली जाईल. लोकलचे काम संपूर्ण झाल्या नंतर लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये उपकरणे बसविण्यात येतील.

हे हि वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments