लोकल

Mumbai Local Update : लोकलमध्ये प्रवास करताना कंटाळताय, मध्य रेल्वेने यावरही शोधले जालीम उपाय…

या ॲपचे विशेष म्हणजे यावर प्रवाशी आवडते चित्रपट पाहू शकतात, गाणी ऐकू शकतात आणि बरेच काही मनोरंजक गोष्टींचा मोफत लाभ घेऊ शकतात.

Mumbai Local Update : मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलने प्रवाशांच्या मनोरंजनासाठी नवीन उपक्रम हाती घेतला आहे. मध्य रेल्वे आणि एका खासगी कंपनीच्या भागीदारीने ‘ कंटेंट ऑन डिमांड’ योजनेअंतर्गत फ्री वायफाय सुविधा आणि करमणुकीसाठी मोबाईल ॲपची सुविधा खास प्रवाशांसाठी जारी होणार आहे. प्रवाशांना वायफाय सुविधा पूर्णतः फ्री मिळणार असून त्याला कोणतेही वेळेचे बंधन नसणार आहे . प्रवाशी हवा तितका वेळ या सुविधेचा लाभ घेऊ शकतात . शुक्रवारी 11 फेब्रुवारी रोजी या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. वायफाय सहित प्रवाशांना ॲपची सुविधादेखील प्राप्त होणार आहे. या ॲपचे विशेष म्हणजे यावर प्रवाशी आवडते चित्रपट पाहू शकतात, गाणी ऐकू शकतात आणि बरेच काही मनोरंजक गोष्टींचा मोफत लाभ घेऊ शकतात. यासाठी प्रवाशांना ‘ मोबाईल शुगर बॉक्स’ नावाचे ॲप डाउनलोड करावे लागणार आहे. मोफत वायफाय सुविधेमुळे या सेवेचा लाभ घेण्यासाठी मोबाईलमध्ये पहिल्यापासून इंटरनेट सेवा असण्याची गरज मुळीच नाही. ( Mumbai Local Update : Bored while traveling in local, Central Railway has also come up with a solution… )

हे उपक्रम मध्य रेल्वेद्वारे एका खासगी कंपनीच्या भागीदारीने राबवले जात आहे. मध्य रेल्वेच्या ताफ्यात सध्या 165 लोकल आहेत त्यापैकी 10 लोकल मध्ये ही यंत्रणा पूर्णपणे बसवून झाली आहे. कुर्ला कारशेडमध्ये याची चाचणी पार पडली. 2022च्या जुलै महिन्यापर्यंत ही यंत्रणा मुंबई उपनगरीय रेल्वमध्ये पूर्णपणे बसवण्यात येणार आहे. या प्रकल्पातून मध्य रेल्वेला पाच वर्षांकरिता 8 कोटी 17 लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळणार आहे.

मोबाईल शुगर ॲप कसे डाउनलोड करायचे आणि त्यावरील सेवांचा लाभ नक्की कसा घ्यायचा ?

  1. प्लेस्टोर किंवा ऍपल स्टोअरमध्ये जाऊन शुगर अ‍ॅप बॉक्स सर्च करा.
  2. अ‍ॅप डाऊनलोड करा किंवा क्यूआर कोड स्कॅन करा (लोकलमध्ये कोड उपलब्ध केला जाईल)
  3. लोकेशन मिळवण्याची परवानगी द्या.
  4. ओटीपीमार्फत तुमच्या मोबाइल क्रमांकाची पडताळणी करून घ्या.
  5. शुगर बॉक्स वायफायला जोडा.
  6. तुमचा मोबाइल डेटा बंद करा.
  7. त्यानंतर अ‍ॅपवर चित्रपट, अन्य करमणुकीचा मोफत आनंद घ्या.

हे हि वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments