लोकल

लस नसलेल्यांनाही मिळणार लोकल प्रवास? थेट हायकोर्टाचे आले नवे आदेश

लस घेतल्याशिवाय मुंबई लोकलमध्ये प्रवास करता येणार नाही, असा नियम रेल्वे विभागाने याआधी घेतला होता. आता मुंबई उच्च न्यायालयाने यामध्ये नवे आदेश लागू केले आहेत.

Mumbai local Update : लस घेतल्याशिवाय मुंबई लोकलमध्ये प्रवास करता येणार नाही, असा नियम रेल्वे विभागाने याआधी घेतला होता. आता मुंबई उच्च न्यायालयाने यामध्ये नवे आदेश लागू केले आहेत.

मंगळवारी, 08फेब्रुवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयात मुंबई लोकलमधील प्रवासाबाबत सुनावणी झाली. लसीकरण न झालेल्या लोकांना मुंबई लोकलमधून प्रवास करता येऊ शकतो का किंवा लसीकरण न झालेल्यांना प्रवासापासून रोखणं योग्य आहे का, हे सिद्ध करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत.

मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती एमएस कर्णिक यांच्या खंडपीठाने एका जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारला हे निर्देश दिले आहेत. याचिकेत राज्य सरकारच्या या निर्णयाला आव्हान देताना हा मनमानी, भेदभाव करणारा आणि घटनेच्या कलम 19 (1) अन्वये मिळालेल्या मुलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारा असल्याचे वर्णन करण्यात आले आहे.

वकील अनिल अंतुरकर यांनी न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडली आहे. कोरोनाच्या अनेक नियमांनुसार हा निर्णयही घेण्यासाठी गेल्या वर्षी बैठक झाली होती. त्यावेळी लसीकरण न झालेल्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी नव्हती.

यावर केंद्राच्या वकिलांनीही आपली बाजू मांडली. लसीकरण न केलेल्या आणि लसीकरण झालेल्यांमध्ये भेदभाव करणारे केंद्राचे असे कोणतेही धोरण नाही. असे मत अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी उच्च न्यायालयात मांडले आहे.

या सगळ्यावरुन मुंबई लोकलमधून लसीकरण न झालेल्यांनाही प्रवास करण्याची परवानगी मिळू शकते का, याचेच उत्तर लवकर मिळण्याची शक्यता आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments