आपलं शहरबीएमसी

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा ब्रिक्स इंटरनॅशनल फोरमकडून सन्मान

मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांना ब्रिक्स इंटरनॅशनल फोरमकडून उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

ब्रिक्स इंटरनॅशनल फोरम (ब्रिक्स-आयएफ) हे एक सामाजिक-आर्थिक-राजकीय केंद्र आहे. जे ब्रिक्स राष्ट्रांत लोकांमध्ये संवाद सुरू करण्याच्या उद्देशाने कार्यरत आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोरोनाकाळात मुंबईकरांसाठी दिलेलं योगदान यासाठी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. 31 जानेवारी 2022 रोजी डॉ. सर्गेई द्वोरियानोव (ब्रिक्स रशियाचे प्रमुख) आणि डॉ. पूर्णिमा आनंद (ब्रिक्स इंटरनॅशनल फोरम इंडिया) यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच दिल्लीत होणाऱ्या त्यांच्या संमेलनात महापौरांना निमंत्रित करण्यात आले आहे.

या अगोदर जून 2021 रोजी कोरोना काळात मुंबईकरांसाठी दिलेल्या विशेष योगदानाबद्दल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडनने सन्मानित करण्यात आलं. मुंबई महापालिका मुख्यालयातील महापौर दालनात हा कार्यक्रम संपन्न झाला होता.

किशोरी पेडणेकर यांची आतापर्यंतची वाटचाल

किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या (191 G/S) वरळीतील गांधीनगर-डाऊन मिलमधील नगरसेविका आहेत.

त्यांचे शिक्षण 10 वी पर्यंत झाले आहे.

किशोरी पेडणेकर यांचे शिक्षण वरळीतील बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल या शाळेत झाले आहे.

किशोरी पेडणेकर या सलग तीन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.

नोव्हेंबर 2019 पासून त्या मुंबईच्या महापौर म्हणून काम करत आहेत.

काही काळासाठी त्यांनी एका वर्षासाठी स्थापत्य शहर समितीच्या अध्यक्षा होत्या.

किशोरी पेडणेकर यांना पालिका कामकाजाचा दांडगा अनुभव आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातल्या शिवसैनिक आहेत

किशोरी पेडणेकर यांना 2017-18 वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments