आपलं शहरबीएमसी

Mumbai Corona : मुंबई महानगरपालिका‌ क्षेत्रातील कोविड मृत्यू शून्यावर, एकही इमारत सील नाही

मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार महानगरपालिका क्षेत्रात आज एकाही कोविड रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.

Mumbai Corona : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (Mumbai Municipal Corporation) अवलंबिलेले विविध उपाय आज पुन्हा एकदा उपयोगी पडले आहेत. दिनांक 2 जानेवारी 2022 नंतर आज पहिल्यांदाच कोविड बाधित मृत्यूंची संख्या शून्यावर आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार महानगरपालिका क्षेत्रात आज एकाही कोविड रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. (Zero Covid Death In Mumbai)

केवळ मृत्यू शून्य नाही तर कंटेनमेंट झोन सिल इमारतींची संख्या देखील आज शून्य इतकीच नोंदविण्यात आली आहे‌. महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांच्या मार्गदर्शनात बृहन्मुंबई महानगरपालिकेने सातत्याने केलेल्या विविध स्तरीय प्रयत्नांना मुंबईकरांची मोलाची साथ लाभल्यामुळेच हे शक्य झाले आहे असल्याचे म्हटले जात आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोविडचा पहिला रुग्ण हा मार्च 2020 मध्ये आढळून आला होता. त्यानंतर 17 ऑक्टोबर 2021 रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद महानगरपालिका क्षेत्रात झाली होती. या नंतर डिसेंबर 2021 मध्ये देखील 7 वेळा शुन्य मृत्यूंची नोंद झाली होती. तर यापूर्वी शून्य मृत्यूची शेवटची नोंद ही 2 जानेवारी 2022 रोजी झाली होती. त्यानंतर आज पहिल्यांदाच पुन्हा एकदा शून्य मृत्यूची नोंद महानगरपालिका क्षेत्रात झाली आहे.

कमी वेळात विविध ठिकाणी उभारण्यात आलेली जंबो कोविड रुग्णालये, लसीकरण सुरू झाल्यानंतर त्याबाबत करण्यात आलेली प्रभावी अंमलबजावणी, प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सातत्याने करण्यात आलेली जनजागृती आणि या सर्व प्रयत्नांना मुंबईकरांनी सातत्याने दिलेला सकारात्मक प्रतिसाद यामुळेच शून्य कोविड मृत्यू यामुळे अग्रेसर होणे शक्य झाले आहे, असे या निमित्ताने अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी नमूद करत मुंबईकरांचे आभार मानले आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments