आपलं शहरलोकल

Mumbai Navi Mumbai Water Taxi : मुंबईत देशातील पहिली वॉटर टॅक्सी, पण सर्व सामान्यांसाठी नेत्रसुखच ?

मुंबईत जलवाहतुकीला बळ देण्यासाठी तसेच जलवाहतूक हा अत्याधुनिक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी वॉटर टॅक्सी प्रकल्प हाती घेतला.

मुंबई : बेलापूर ते भाऊचा धक्का अवघ्या 30 मिनिटांत पार करणारी स्पीडबोट (Mumbai Navi Mumbai Water Taxi) आजपासून (17 फेब्रुवारी) मुंबईकरांच्या सेवेसाठी रुजू होत आहे. देशातील पहिलीच वॉटरटॅक्सी मुंबईतून सुरू होत आहे. मोठा गाजावाजा करत वॉटरटॅक्सीची ओळख करून दिली जातेय, मात्र सत्यपरिस्थितीत हौसेमौजेचे वा मुंबईकरांसाठी नेत्रसुखच असल्याची चर्चा होतेय.

मुंबईत जलवाहतुकीला बळ देण्यासाठी तसेच जलवाहतूक हा अत्याधुनिक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी वॉटर टॅक्सी प्रकल्प हाती घेतला. मुंबई पोर्ट ट्रस्ट, महाराष्ट्र सागरी मंडळ आणि सिडको अशा 3 यंत्रणांनी वॉटर टॅक्सी प्रकल्प प्रत्यक्षात आणला.

वॉटर टॅक्सीचे काय आहेत नेमके दर? (Rate Of Water Taxi)

  • बेलापूर ते भाऊचा धक्का (डीसीटी) स्पीडबोट – 825 ते 1210 रुपये (एकेरी) (30 मिनिट प्रवास कालावधी)
  • बेलापूर ते भाऊचा धक्का (डीसीटी) कॅटामरान – 290 रुपये (एकेरी) (50 मिनिटे प्रवासी कालावधी)
  • बेलापूर ते जेएनपीटी स्पीडबोट – 825 रुपये एकेरी (20 मिनिटे प्रवास कालावधी)
  • बेलापूर ते एलिफंटा स्पीडबोट – 825 रुपये एकेरी (20 मिनिटे प्रवास कालावधी)

तुलनेने ॲप आधारित टॅक्सी परवडली

नवी मुंबई ते भाऊचा धक्का असा प्रवास नागरिकांनी ओला, ओबेरने केला तर त्याचे 500 ते 600 रुपये भाडे होते. त्यात 4 जण एका गाडीतून जाऊ शकतात. म्हणते नाही नाही म्हंटल तरी एका प्रवाशाचा खर्च 150 रुपये होतो. तेच जर स्पीडबोटने जायचं ठरवलं तर एकाच व्यक्तीसाठी 825 रुपये मोजावे लागतात. स्पीडबोटने भलेही वेळ वाचत असेल, मात्र सामान्यांच्या आवाक्याबाहेर असणारी किंमत खिशाला कात्री लावणारी ठरत आहे.

बेलापूर आणि नेरुळ येथे नवी जेट्टी वॉटर टॅक्सी प्रकल्पासाठी बांधण्यात आली आहे. 4 खासगी कंत्राटदारांची नियुक्ती करत त्यांच्या माध्यमातून वॉटर टॅक्सीची प्रत्यक्ष सेवा देण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ सज्ज झाले आहे. आज एकीकडे वॉटर टॅक्सीचे लोकार्पण होणार, तर दुसरीकडे प्रवाशांचा याला कितपत प्रतिसाद मिळेल, यावर शंका व्यक्त केली जातेय.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments