लोकल

मुंबई रेल्वे जिंदाबाद, रेल्वे स्टेशनमध्येच महिलेची केली यशस्वी डिलिव्हरी

Mumbai Railway :  रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. प्रवासात पुरुषांप्रमाणे महिलाही प्रवास करत असतात. प्रवासात गर्भवती महिलांसह अनेक गरजू रुग्णांसाठी रेल्वे नेहमीच सक्रिय भूमिका बजावते. अशाच एका घटनेत प्रियांका शर्मा नावाच्या गरोदर महिला लोकमान्य टिळक टर्मिनस ते फुलपूर प्रयागराज जवळ 11071 कामायनी एक्स्प्रेसच्या शयनयान श्रेणीमधून प्रवास करत असताना  9 फेब्रुवारी रोजी रोजी साधारण दुपारी 4.30  वाजता ट्रेन कसारा आणि इगतपुरी दरम्यान होती तेव्हा संबंधित महिलेला प्रसूती वेदना झाल्या.

ऑन-बोर्ड टीसी कर्मचाऱ्यांनी ताबडतोब याबाबत आनंद शिंदे, उप स्टेशन व्यवस्थापक, इगतपुरी यांना माहिती दिली. संदेश मिळाल्यावर शिंदे यांनी इगतपुरी स्टेशनवर महिला डॉक्टर आणि महिला आरपीएफ कॉन्स्टेबल सुश्री सविता यांची S/9 कोचच्या सीट क्रमांक 6 वर येण्याची व्यवस्था केली. डॉ. ज्योत्सना, अतिरिक्त विभागीय वैद्यकीय अधिकारी आणि टीम उपस्थित झाले आणि रुग्णाला तपासून इगतपुरी येथे थांबण्याचा सल्ला दिला.

तथापि, प्रसूती वेदना असलेल्या प्रियांका या महिलेने रेल्वे वैद्यकीय पथकाच्या मदतीने 5 वाजुन 17 मिनिटांनी स्थानकाच्याच प्रतिक्षालयात एका निरोगी बाळाला जन्म दिला. नवजात व महिलेला प्रसूतीपश्चात उपचारासाठी रुग्णवाहिकेद्वारे इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments