आपलं शहर

Mumbai School News : शिक्षण विभागाने केले परीक्षेचे दोन्ही मोड ऑन; परीक्षा ऑनलाईन द्यायची का ऑफलाईन?

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या लेखी सूचनेनुसार," मुंबई पालिका क्षेत्रातील पहिली ते आठवीच्या परीक्षा ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही स्वरूपात होतील.

गेल्या महिन्यात कोरोना पार्श्वभूमीवर 2 ते 2.5 वर्षे बंद असलेल्या मुंबई पालिका क्षेत्रातील शाळांचे दरवाजे उघडण्यात आले. मुंबई पालिका शिक्षण विभागाने पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांवर लेखी परीक्षेची सक्ती न करण्याचे आदेश दिले आहेत. शिक्षणाधिकारी राजेश कांबळे म्हणाले की, “जे विद्यार्थी ऑफलाईन लेखी परीक्षेसाठी उपस्थित राहू शकत नाही, त्यांच्यासाठी ऑनलाईन परीक्षेचा पर्याय उपलब्ध करावा.” ( Mumbai School News : Education Department conducts both mode of examination; Why take exams online and offline? )

मुंबई पालिका हद्दीतील शाळा आणि ज्युनियर कॉलेज 24 जानेवारीपासून सुरू करण्यात आले. शाळेत येण्यासाठी पालकांचे संमतीपत्र अनिवार्य होते. पाल्याला शाळेत पाठवायचे की नाही? हा पालकांचा वैयक्तिक प्रश्न होता. तरीही, पालकांकडून आणि विद्यार्थ्यांकडून शाळांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबई पालिका शिक्षण विभागाने शाळेत उपस्थित न राहू शकणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवणी देण्याचा पर्यायदेखील उपलब्ध करून दिला.

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या लेखी सूचनेनुसार,” मुंबई पालिका क्षेत्रातील पहिली ते आठवीच्या परीक्षा ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही स्वरूपात होतील. यातील कोणती परीक्षा आपण द्यायची? हा प्रश्न पालक आणि विद्यार्थी यांचा वैयक्तिक प्रश्न आहे.”

हे हि वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments