घटना

मलिकांना अटक झालेल्या दुसऱ्याच दिवशीच भिडली काँग्रेस – शिवसेना

3 मार्च 2022 पर्यंत त्यांना ED कोठडी सुनावण्यात आली. याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील सर्व नेत्यांनी आंदोलन करण्याचं ठरवलं.

Mumbai Tipu Sultan : 23 फेब्रुवारी 2022रोजी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ED (अंमलबजावणी संचालनालय – enforcement Directorate) ने अटक केली. 3 मार्च 2022 पर्यंत त्यांना ED कोठडी सुनावण्यात आली. याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील सर्व नेत्यांनी आंदोलन करण्याचं ठरवलं. मुंबईतील मंत्रालयाच्या गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करण्याच ठरवलं. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे सुभाष देसाई असे अनेक नेते उपस्थित होते. मात्र या सगळ्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट घडली.

याच दिवशी राज्यात सत्तेत असलेल्या कांग्रेस आणि शिवसेनेमधील एक वाद चव्हाट्यावर आला आहे. 26 जानेवारी 2022 रोजी मालाड मधील एका मैदानाला टीपू सुलतान नाव देण्यात आलं होतं. त्याच मैदानावरून पुन्हा वाद सुरु झाला आहे. काँग्रेसकडून टीपू सुलतान नाव दिल्यानंतर आता त्या नावावर शिवसेनेने आक्षेप घेत मुंबई पालिकेमध्ये एक प्रस्ताव मांडला आहे.

झाशीची राणी लक्ष्मीबाई असं नामकरण करण्याचा प्रस्ताव शिवसेना नगरसेवकांकडून पालिकेत देण्यात आला होता. या प्रस्तावाला पालिकेच्या बाजार आणि उद्यान विभागाने मंजुरी दिली आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या मतदार संघामध्ये हे मैदान आहे. त्यांनी या मैदानाचं सुशोभिकरण केले होते आणि त्याचं उद्घाटनही केलं होतं. याच उद्घाटनावेळी मैदानाच्या नामफलकावर टीपू सुलतान मैदान असं लिहण्यात आलं होतं. तेव्हा भाजप नेत्यांनी या नावावरून राडा केला होता.

टिपू सुलतानच्या नावावरून भाजपच्या सर्व नेत्यांनी शिवसेनेलाही धारेवर धरलं होतं. अखेर शिवसैनिकांकडून पालिकेत झाशीची राणी लक्ष्मीबाई असं नामकरण करण्याचा प्रस्ताव दिल्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेतील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments