आपलं शहरभुक्कड

Mumbai traffic : मुंबईच्या वाहतूक कोंडीत स्वीगीचा डिलिव्हरी बॉय ठरला कर्नलसाठी देवदूत

फूड डिलिव्हरी अँप स्विगीने इन्स्टाग्रामवर नुकतीच मुंबईतील ही घटना काय होती याबाबत पोस्ट केली असून ती वाचून तुम्हीही भावनिक झाल्याशिवाय राहणार नाहीत.

मुंबईच्या ट्रॅफिकचा अनुभव तुम्ही एकदा तरी घेतला असलेच. एकदा का ट्रॅफिकमध्ये अडकलो, की त्यातून सुटण्याचा काही नेम नसतो. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी तर मुंबईतील वाहतूक कोंडीबाबत वेगळाच तर्क लावला. अनेकांना मुंबईतील वाहतूक कोंडीचा अनुभव आला असेल. रुग्णाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणारी गाडी ट्राफिकमध्ये अडकली पण यामध्ये स्वीगीचा डिलिव्हरी बॉय ठरला देवदूत. (Swiggy order online)

दिनांक 25 डिसेंबर 2021 आजारी असणाऱ्या सेवानिवृत्त कर्नलला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणारी गाडी ट्रॅफिकमध्ये अडकली. पण वेळीच तेथे स्विगी कंपनीचा डिलिव्हरी बॉय पोहोचला, व त्याच्या मदतीने सेवानिवृत्त कर्नलला हॉस्पिटलमध्ये वेळेत नेणं शक्य झालं आणि निवृत्त कर्नलचे प्राण थोडक्यात वाचले. डिलिव्हरी बॉय देवा सारखा मदतीला धावून आला. यामुळे कर्नल यांचे प्राण वाचले. (Swiggy Food Online)

फूड डिलिव्हरी अँप स्विगीने इन्स्टाग्रामवर नुकतीच मुंबईतील ही घटना काय होती याबाबत पोस्ट केली असून ती वाचून तुम्हीही भावनिक झाल्याशिवाय राहणार नाहीत. मुंबईचा स्विगी डिलिव्हरी बॉय मृणाल किरदत याने सेवानिवृत्त कर्नल मनमोहन मलिक यांचे प्राण वाचवले. (Swiggy Food Menu)

निवृत्त कर्नलचे प्राण वाचवणाऱ्या मृणालचे खूप कौतुक करत आहेत. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मनमोहन मलिक यांनीही डिलिव्हरी बॉय किरदत याचे कौतुक केले आहे.तसेच सर्वच स्तरातून डिलिव्हरी बॉयचे कौतुक होत आहे. तर त्याच्या वडिलांना देखील त्याचा अभिमान वाटत आहे. (Swiggy Delivery Boy)

मुंबई शहरात लोकांची नेहमीच धावपळ पाहायला मिळते. यामध्ये अनेक पोस्टीव्ह आणि नकारत्मक गोष्टी पाहायला मिळतात. परंतू एका डिलिव्हरी बॉयने केलेली कामगिरी पाहून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Swiggy Super Boy)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments