विद्यापीठ

मुंबई विद्यापीठातील ग्रंथालयातील पुस्तकांना वाळवी

प्रतिष्ठित मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयात अस होत असेल तर बाकी ठिकाणी कशी अवस्था असेल याची चर्चा सुरू झाली आहे.

Mumbai University News : मुंबई विद्यापीठाच्या दुर्लक्ष आणि दुर्लक्षित कारभारामुळे गेल्या अनेक वर्षांपासून कलिना संकुलातील जवाहरलाल नेहरू ग्रंथालयातील पुस्तके अखेरचा श्वास घेत आहेत. यामुळे प्रतिष्ठित मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयात अस होत असेल तर बाकी ठिकाणी कशी अवस्था असेल याची चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई विद्यापीठातील ग्रंथालयाची दुरावस्था केविलवाणी झाली असून ग्रंथालयातील दुर्मिळ पुस्तके, विविध संदर्भ ग्रंथ, जुनी वर्तमानपत्रे यांना वाळवी लागली आहे. अनेक पुस्तके हे वाळवीचे खाद्य बनले आहेत. विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे विद्यापीठाकडून दुर्लक्ष केले जात असताना आता स्वत:चे अस्तित्त्व टिकवण्यासाठी पुस्तकांवरही त्यांना न्याय मिळण्यासाठी आंदोलन करावे लागेल असा इशारा छात्र संघटनेकडून देण्यात आला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू ग्रंथालयात संदर्भ ग्रंथ, पुस्तके, वर्तमानपत्रे यांची मिळून लाखोंची ग्रंथसंपदा आहे. विद्यापीठाकडून सदर ग्रंथालयाच्या दुरुस्तीचे काम रखडले असून ग्रंथालयातील पुस्तके, संदर्भ ग्रंथ, वर्तमानपत्रे योग्य पद्धतीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करणे आवश्यक असताना विद्यापीठाने ही ग्रंथसंपदा पोत्यामध्ये तसेच इतर ठिकाणी ठेवली जात आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments