बीएमसी

Mumbai Vaccination : लसीकरणात मुंबई अव्वल; तब्बल एवढ्या लोकांचे लसीकरण पूर्ण

जानेवारी 2021 पासून लसीकरणाला सुरुवात झाली. तेव्हापासून लसीच्या दोन्ही मात्रा देण्यामध्ये मुंबई महापालिकेने आघाडी घेतली आहे.

Mumbai Vaccination : जानेवारी 2021 पासून लसीकरणाला सुरुवात झाली. तेव्हापासून लसीच्या दोन्ही मात्रा देण्यामध्ये मुंबई महापालिकेने आघाडी घेतली आहे. राज्यात सर्वाधिक लसीकरण करण्याचा मान मुंबईने मिळवला आहे. मुंबईत लशीची पहिली मात्रा 110.40 टक्के तर दुसरी मात्रा 93.88 टक्के पूर्ण झाली आहे. त्यामुळे मुंबईचा अ श्रेणीत समावेश झाला आहे. परिणामी मुंबईत अनेक निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईत 2 लाख 14 हजार 849 लाभार्थ्यांना बूस्टर डोस दिला आहे. मुंबईने लसीचा पहिली, दुसरी डोस आणि बूस्टर डोस देण्यामध्ये आघाडीवर आहे. वर्षभरात मुंबईमध्ये 1 कोटी 4 लाख 68 हजार 791 तर दुसरा डोस घेणारे 93 लाख 70 हजार 922 जणांना देण्यात आला आहे. सध्या मुंबईत एकूण 459 लसीकरण केंद्राच्या माध्यमातून लसीकरण करण्यात येत आहे. त्यात महापालिका 290 राज्य व केंद्र सरकार 19 व खासगी 150 लसीकरण केंद्रांचा समावेश सबे.

मुंबई महानगरपालिकेची विविध रुग्णालय तसेच लसीकरण केंद्रावर सर्वाधिक लसीकरण पार पडलं आहे. पालिकेच्या लसीकरण केंद्रावर 1 कोटी 18 लाख 95 हजार 683 लाभार्थ्यांचे लसीकरण पार पडले. तर राज्य आणि केंद्र सरकारची रुग्णालये तसेच लसीकरण केंद्रावर 8 लाख 85 हजार 771 तर खासगी रुग्णालय आणि लसीकरण केंद्रावर 62 लाख 49 हजार 201 लाभार्थ्यांचे लसीकरण झाले आहे.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments