बीएमसी

Narayan Rane : नारायण राणेंना नेमकी कसली नोटीस, पहा A टू z माहिती

भाजपचे नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊताना प्रतिउत्तर दिले. तत्पूर्वी नारायण राणेंना त्यांच्या जुहूतील अनधिकृत बंगल्याविषयी मुंबई महानगरपालिकेने नोटीस पाठवली.

Narayan Rane : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 15 फेब्रुवारी ला घेतलेल्या पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट करून भाजपच्या 3 नेत्यांवर आरोप केला होता. देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या आणि मोहित कंबोज. त्यानंतर भाजपचे नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊताना प्रतिउत्तर दिले. तत्पूर्वी नारायण राणेंना त्यांच्या जुहूतील अनधिकृत बंगल्याविषयी मुंबई महानगरपालिकेने नोटीस पाठवली.

आता मुंबई महानगरपालिकेचे पथक केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या मुंबईतील जुहूच्या बंगल्यावर अनधिकृत बांधकामाचे मोजमाप करण्यासाठी जाणार आहे.

1888 च्या कलम 488 अंतर्गत मुंबई महापालिकेच्या के-वॉर्डकडून राणेंना ही नोटीस देण्यात आली. बांधकामाची पडताळणी या पथकाकडून केली जाईल. बंगल्याच्या बांधकामासाठीची कागदपत्रे तयार ठेवण्यासंदर्भात नोटीस पाठवली गेल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितली.

माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी चार वर्षांपूर्वी तक्रार करूनही बंगल्याच्या बांधकामावर कारवाई करत नाही अशी आठवण मुंबई महानगरपालिकेला करून दिली. तसेच हा बंगला समुद्रकिनाऱ्यापासून 50 मीटरवर आहे आणि सीआरझेडचे नियम तोडून हा बंगला बांधल्याचे दौंडकर यांनी सांगितले.

जर तपासणीनंतर अनधिकृत बांधकाम आढळून आल्यास पुन्हा एक नोटीस देण्यात येईल. तसेच बंगल्याची वैधता दाखवून देण्यासाठी काही वेळसुद्धा देण्यात येईल. आणि कायदेशीर कागदपत्रे सादरकरण्यात अपयशी ठरल्यास पडकामाची कारवाई करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments