घटना

नवी मुंबई पालिकेचा महाविक्रम, 1 मिलियनचा टप्पा केला पार

नवी मुंबई महानगरपालिकेने सुमारे 10 लाख लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस दिले आहेत.

Navi Mumbai Vaccination : सध्या कोरोनावर मात करण्यासाठी अनेक पालिका आपल्याला होईल तितके प्रयत्न करताना दिसत आहे. यातच आता नवी मुंबई महानगर पालिकेने आपलं महत्त्वाचं कर्तव्य पार पाडलं आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने सुमारे 10 लाख लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस दिले आहेत.

नवी मुंबई पालिकेने आतापर्यंत शहरातील सुमारे 1 दशलक्ष लोकांना कोरोनाचे दोन्ही डोस दिले आहेत. कोरोनाची लस लागू झाल्यापासून नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना लस देण्यास सुरुवात झाली होती. यामुळे नवी मुंबई पालिका ही पहिली पालिका होती, जी शहराच्या 90 टक्क्यांहून अधिक लोकांना पहिला डोस देण्यास यशस्वी झाली होती.

प्रत्येकाला डोस मिळावा यासाठी पालिकेने अनेक स्तरातून काम केलं होतं, सुरुवातीला पालिकेने शहरातील जवळपास सर्वच सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणाची मोहीम सुरू केली होती. सोबतच पालिकेला लसींचा पुरवठा सुरू राहिल्याने, पालिकेचे लोकांना लसीकरण करणे खूप सोपे झाले. त्यात पालिकेच्या वतीने लसीकरण मोहिमेची जोरदार चर्चा झाली.

महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी शहरातील जवळपास सर्वच नाक्यांवर जाऊन लसीचे डोस दिले होते. 100 टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस देणे हे पालिकेचे पुढील उद्दिष्ट आहे. यासोबतच पालिकेकडून बुस्टर डोसही मोठ्या प्रमाणात दिला जात आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments