राजकारण

ED ऑफिस ते ED कस्टडी, व्हाया J.J हॉस्पिटल, आता मलिकांसमोर काय वाडून ठेवलय?

नवाब मलिक यांना सध्या Enforcement Directorate म्हणजेच ईडीच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. कुर्ल्यातील कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.

Nawab Malik Update : नवाब मलिक यांना सध्या Enforcement Directorate म्हणजेच ईडीच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. कुर्ल्यातील कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र त्याच दरम्यान त्यांची तब्येत खालावली असल्यामुळे त्यांना लगेचच JJ रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता पुन्हा त्यांना ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आले आहे. पण या सर्वच्या पहिला त्यांच्या अटकेची संपूर्ण साखळी पाहुयात.

23 फेब्रुवारी 2022ला सकाळी नवाब मलिकांच्या घरी ईडीचे अधिकारी गेले होते. त्यांना 8 तासांच्या चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले होते. तेव्हाच राष्ट्रवादीकडून ईडीच्या कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्यात आले होते.

8 तासांच्या चौकशीनंतर मलिकांना अटक करण्यात आली. तिथून त्यांना चाचणीसाठी जे जे रुग्णालयात नेले होते. तिथून त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने मलिकांना 7 दिवसांची म्हणजेच 3 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली.

याच दरम्यान 25 फेब्रुवारीला त्यांना जे जे रुग्णालयात त्यांची तब्येत बिघडल्यामुळे नेण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना पोटदुखीमुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते, अशी माहिती त्यांची मुलगी निलोफर मलिक यांनी दिली.

28 फेब्रुवारी 2022ला मलिकांना उपचार पूर्ण झाल्यावर रुग्णालयातून सोडण्यात आले. आता सध्या मलिक ईडीच्या कोठडीत आहेत. मलिक जरी ईडीच्या कोठडीत अटकेत असले तरी ते अल्पसंख्याक विकासमंत्री या पदावर आहेत. तसेच आता भाजपकडून त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यासाठी दबाव टाकला जात आहे. मात्र राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीचे नेते मलिकांनी राजीनामा न घेण्याच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे मलिकांविरुद्ध ही लढाई सुरू आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments