भुक्कड

Pizza Restaurants : विदेशी पिझ्झाला देशी तडका, परवडणाऱ्या पिझ्झाची भन्नाट कहाणी

अनेक विदेशी खाद्यपदार्थांनी आपल्या वडापावची जागा घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ते अनेकांना जमलं नाही, म्हणून त्यातच बदल करत वडापावमध्ये व्हरायची आणण्याचा अनेकांनी प्रयत्न केला.

Pizza Restaurants : मुंबईकर चालता, बोलता, धावतानासुद्धा वडापाव खात असतात, ही मुंबईकरांची एक कलाच म्हणावी लागेल, मात्र याच कलेमध्ये दिवसेंदिवस अनेक बदल होत चालले आहेत, त्यातलाच एक बदल म्हणजे वडापावला पिझ्झाचे रूप. हा नवा प्रयोग केलाय नायगावच्या अक्षय धनावडेने.

अनेक विदेशी खाद्यपदार्थांनी आपल्या वडापावची जागा घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ते अनेकांना जमलं नाही, म्हणून त्यातच बदल करत वडापावमध्ये व्हरायची आणण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. यामध्ये बर्गर, पिझ्झाचाही महत्त्वाचा रोल आहेच. पिझ्झा हा विदेशी पदार्थ असला, तरी मुंबईतील एका तरुणाने त्याला देशी तडका मारण्याचा प्रयत्न केला आहे. या देशी तडक्यामुळे पिझ्झ्याला इतकं भन्नाट रूप आलं आहे की त्याचा नादच खुळा.

मुंबईत जितके लोकं आहेत, त्या सर्वांच्या खिशाला परवडणारा एकच पदार्थ, तो म्हणजे मुंबईचा वडापाव. याच्यातच अजून एकाची बर पडली आहे, ती म्हणजे पिझ्झाची. वसई नायगाव येथील अक्षय धनावडे या तरुणाने चक्क भारतीय पद्धतीने पिझ्झा तयार केलाय. या विदेशी पिझ्झ्याला वेगवेगळ्या भाज्यांची चव, मुंबईचा वडापाव, कडीपत्तेचा तडका आणि पनीरची चटक देण्याचा प्रयत्न अक्षयने केलाय.

अक्षयने फक्त देशी तडका देण्याचा प्रयत्न नाही केला तर, देशातील चार बाजूच्या संस्कृतींना एकत्र आणण्याचा प्रयत्न केलाय. बंगलाच्या वेगवेगळ्या भाज्यांची चव, पश्चिमेला मुंबईचा वडापाव, दक्षिणेला कडीपत्ता तडका, तर उत्तरेला पनीर असणारे पदार्थ स्वाद एकाच पिझ्झामध्ये मिळणार आहे.

नायगाव येथे अक्षय आपलं छोटं कॅफे चालवतो, याठिकाणी येणारी ग्राहक या पिझ्झाला चांगली पसंती दर्शवत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सर्वजण देत असलेले पदार्थ आपण ग्राहकांना देतोय, त्यामुळे ग्राहकांना वेगळे काहीतरी देण्याच्या विचाराने हा नवीन स्वादिष्ट पिझ्झा देण्याचे त्याने ठरवले होते.

पाहा संपूर्ण व्हिडीओ :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments