आंतरराष्ट्रीय

Ukraine to Mumbai : युक्रेनवरून निघाले विध्यार्थी: थेट मुंबईला रवाना, विमान कधी पोहचणार?

भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना युक्रेनमधून भारतात आणण्यासाठी भारताचे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. युक्रेनमधून 219 विद्यार्थी भारतात आणण्यात येणार आहेत. त्याची सुरुवातही झाली आहे.

Ukraine to Mumbai : भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना युक्रेनमधून भारतात आणण्यासाठी भारताचे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. युक्रेनमधून 219 विद्यार्थी भारतात आणण्यात येणार आहेत. त्याची सुरुवातही झाली आहे.

रशिया आणि युक्रेनमधील युद्धात अनेक भारतीय नागरिक अडकले आहेत. जवळपास 18 हजारहून जास्त भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत.

मुंबईत येणाऱ्या विद्यार्थी आणि नागरिकांचे स्वागत करण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावर उपस्थित राहणार आहेत.

रोमानियावरून मुंबईकडे पहिले उड्डाण करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. एस जयशंकर यांनी दिली. तसेच नागरिक मुंबई विमानतळावर आल्यावर कोरोनाच्या प्राश्वभूमीवर त्यांचे तापमान आणि इतर तपासणी केली जाईल. रोमानियावरून निघालेले विमान आज (शनिवारी, 26 फेब्रुवारी रोजी) रात्री 9 वाजता मुंबई विमानतळावर पोहचेल. त्यांची सर्व सोय तेथे करण्यात येईल. अशी माहिती मुंबई पालिकेकडून देण्यात आली आहे.

व्हिडीओच्या माध्यमातून युक्रेनमधील सर्व भारतीय नागरिक आपली परिस्थिती मांडत आहेत. डॉ. एस. जयशंकर यांनी सांगितले की ते नागरिकांना भारतात आणण्यासाठी सर्वोत्तोपरी प्रयत्न करत आहेत आणि ते स्वतः या घटनामध्ये लक्ष देत आहेत. मात्र अजूनही तिथल्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचं समोर येत आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments