राजकारण

Political Tweeter War : एकाने मेमरीची घंटा वाजवली तर दुसरे म्हणतात मला बोलायला लावू नको !

केंद्रित मंत्री नारायण राणे यांनी सुशांत सिंह राजपूतशी संबंधित घटनेचा दाखला देत मिलिंद नार्वेकर यांच्यावर टीका केली.

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर राज्यात आरोप प्रत्यारोपांची चांगलीच मालिका (Political Tweeter War) सुरू झाली. राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर निशाणा साधला. त्यात, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांचा राणेंकडून ‘मातोश्रीतील बॉय’ असा खोचक शब्दात उल्लेख करण्यात आला.

नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत नार्वेकरांची खिल्ली उडवली

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर शेलक्या शब्दात टीका केली. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर असे नेते उपस्थित नव्हते असा प्रश्न विचारल्यावर राणे त्याला खोचक शब्दात प्रतिउत्तर देतात. कोण नार्वेकर? मातोश्रीमध्ये पूर्वी बॉयचं काम करायचे तो काय? माझ्यासमोरची गोष्ट आहे ओ, मी पाहिलंय.. बेल मारली की येस सर… काय आणू? असं म्हणणारा नार्वेकर नेता बनलाय. काय अपग्रेडेशन स्पीड आहे, असे म्हणत राणेंनी मिलिंद नार्वेकरांची (Milind Narvekar) खिल्ली उडवली.

मिलिंद नार्वेकरांनी प्रतीउत्तररार्थ थेट राणेंच्या मेमरीची घंटाच वाजवली! 

“मातोश्रीमध्ये पूर्वी बॉयचं काम करायचे तो काय?” नारायण राणे यांच्या उल्लेखाला मिलिंद नार्वेकरांनिही करारा जवाब दिला. नार्वेकरांनी ट्विट करत “बॉय का? अच्छा! स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करून विनंत्या केल्याचं विसरलात? वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?” राणेंच्या मेमरीची घंटा वाजवत प्रतिउत्तर दिले.

राणेंचा पुन्हा नार्वेकरांवर हल्लाबोल 

नारायण राणे यांनी नार्वेकरांनी केलेल्या ट्विटला उत्तर देत थेट सुशांत सिंह राजपूतच्या प्रसंगाशी जोडला. नार्वेकरांचे ट्विट रीट्विट करत राणे म्हणतात, “सुशांतसिंगच्या हत्येनंतर आपल्या फोनवरून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोनवेळा कॉल केला होता हे आपण विसरलात की काय ? अश्या किती घटना मी आपणांस सांगू ? मला बोलायला लावू नका.”

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments