नॅशनल

दिल्लीच्या राजपथावरही उत्तर प्रदेशच नंबर वन, महाराष्ट्राला कोणता पुरस्कार?

प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावरील संचलनात सहभागी झालेल्या 12 राज्यांनी आणि 9 मंत्रालयाचे चित्ररथ असे एकूण 21 चित्ररथ सहभागी होते

Uttar Pradesh Chitrarath : उत्तर प्रदेश चित्ररथाने या वर्षी पहिला नंबर पटकावला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावरील संचलनात सहभागी झालेल्या 12 राज्यांनी आणि 9 मंत्रालयाचे चित्ररथ असे एकूण 21 चित्ररथ सहभागी होते. त्यामध्ये उत्तर प्रदेशचा पहिला, कर्नाटकचा दुसरा नंबर आला. तर नेहमीच महाराष्ट्राचा चित्ररथ आकर्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला या वर्षी पब्लिक चॉईस अवॉर्डने गौरवण्यात आले.

याबरोबरच सीआयएफच्या चित्ररथाला सर्वोत्तम सेंट्रल आर्म पोलिस फोर्समधील चित्ररथ म्हणून गौरविण्यात आले असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. उत्तर प्रदेशाचा हा ‘एक जिल्हा, एक वस्तू आणि काशी विश्वनाथ धाम’ यावर चित्ररथ आधारित होता.

तसेच संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या वर्षी पहिल्यांदाच नागरिकांना MyGov द्वारे ऑनलाईन स्वतःचे मत देऊन सर्वोत्कृष्ट चित्ररथ निवडण्याची संधी मिळाली. 25 ते 31 जानेवारी दरम्यान हे ऑनलाइन मतदान घेण्यात आले.

“इतर सहाय्यक दल आणि विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय मंत्रालये/विभाग यांच्याकडून मार्चिंग दलाच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी न्यायाधीशांच्या तीन पॅनेलची नियुक्ती करण्यात आली होती,” मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments