भुक्कड

Dabewala Bhavan : डबेवाल्यांचा ‘तो’ प्रश्न पुन्हा चर्चेत; आता मुख्यमंत्री पाळणार का आपला शब्द?

मुंबईचा डबेवाला आणि मुंबई यांचं अतूट नातं मुंबईकरांना परिचित आहे. डबेवाल्यांची ख्याती केवळ मुंबई मर्यादित नाही तर सातासमुद्रापार त्यांची ख्याती आहे.

Dabewala Bhavan : लोकलने प्रवासाला परवानगी नव्हती, तर सोसायटीमध्ये देखील परवानगी दिली जात नव्हती. या सर्व परिस्थितीवर मात करून डबेवाले पुन्हा आपला व्यवसाय सुरू करतायत. परंतु सत्ताधारी शिवसेनेने डबेवाल्यांना दिलेल्या वचनाकडे मात्र दुर्लक्ष केलेलं दिसत आहे. मुंबईचा डबेवाला आणि मुंबई यांचं अतूट नातं मुंबईकरांना परिचित आहे. डबेवाल्यांची ख्याती केवळ मुंबई मर्यादित नाही तर सातासमुद्रापार त्यांची ख्याती आहे. याच डबेवाल्यांना कोरोनाकाळात अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. ((Question to CM on Dabewala Bhavan, when will Dabewala Bhavan be built)

महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेने मुंबईत डबेवाला भवन उभारण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र सध्यातरी असे भवन उभे राहिलेले नाही. याचीच आठवण सेनेला आणि मुख्यमंत्र्यांना व्हावी यासाठी मुंबई डबेवाला असोसिएशनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे.

डबेवाल्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, वारकऱ्यांप्रमाणे डबेवाल्यांसाठी मुंबईत डबेवाला भवन उभारणारच, त्यासाठी मुंबई महानगर पालिकेची कुठे जागा उपलब्ध आहे, हे पाहुन निर्णय घेतला जाईल. असे आश्वासन आपण मुंबईच्या डबेवाल्यांना दिले होते. त्यानुसार शिवसेनेच्या वचननाम्यात घोषणा करण्यात आली होती.

तीन वर्षांपुर्वीच्या मुंबई महानगर पालीकेच्या अर्थ संकल्पात डबेवाला भवनसाठी 1 कोटी रूपयांची आर्थिक तरतुद केली होती. या बाबत मुबंई तात्त्कालीन शिवसेना नगरसेविका आणि विद्यमान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी डबेवाला भवनचा प्रस्ताव मुंबई महानगर पालिका सभागृहात मांडला होता. सभागृहानेही त्याला एक मताने मंजुरी दिली आहे. पुढे हा प्रस्ताव मुंबई महानगर पालिका आयुक्त यांच्या मंजुरीसाठी पाठवला गेला. इतकं सगळं झाल्यानंतर डबेवाला भवनासाठी जागा उपलब्ध न झाल्यामुळे डबेवाला भवन अद्यापपर्यंत प्रत्यक्षात साकारले गेले नाही. आमचा तुमच्यावर आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचेवर दृढ विश्वास आहे. तुमच्या संयुक्त प्रयत्नाने डबेवाला भवनासाठी जागा उपलब्ध होईल आणि भव्यदिव्य असे डबेवाला भवन लवकरच साकारले जाईल, असा विश्वास आम्हाला आहे. अशा स्वरूपाचे पत्र मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलं आहे.

चार वर्षे उलटून गेल्यानंतरही डब्बेवाला भवन काही उभारले गेले नाही. महत्त्वाचे म्हणजे महापालिकेच्या 2021 – 22 च्या अर्थसंकल्पातही आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्या बजेट भाषणात यासाठी 1 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली होती.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments