राज ठाकरे यांचे ‘हे’ दोन फोटो पाहून तुम्हाला काय वाटतं?
गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांना ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलय, त्यानंतर अनेकजण त्यांना भेटायला जात आहेत

Raj Thackeray Mask : गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांना ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलय, त्यानंतर अनेकजण त्यांना भेटायला जात आहेत, अशातच राज ठाकरेदेखील लतादीदींना भेटायला गेले होते. यावेळी राज ठाकरे यांनी मास्क घातला होता, आता कधी मास्क न घालणारे राज ठाकरे जेव्हा अचानक मास्क घालतात तेव्हा मीडियामध्ये त्याची होतेच, म्हणून ही चर्चा का होते, हेच आपण पाहणार आहोत.
कोरोना आल्यापासून मास्क का घालावा, हा प्रश्न राज ठाकरे स्वत: अनेकांना विचारत असत. अनेक कार्यक्रमात कार्यकर्त्यांना ‘मास्क काढ’ म्हटल्याचे अनेक व्हिडीओंची चर्चाहीी झाली होती. तुम्ही मास्क का घालत नाही, असा सवाल जेव्हा पत्रकार राज ठाकरे यांना करतात, तेव्हा ते पत्रकारांनाच उत्तर देतात की तुम्ही घालत नाही, म्हणून मी नाही घालत.
राज ठाकरे यांच्या मास्क न घालण्याची चर्चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यापर्यंत पोहचली होती, त्यावेळी राज ठाकरेंच्या मास्क न घालण्यावरून हे चुकीचं असल्याचंही अनेक नेते, मंत्र्यांनी म्हटलं होतं.
नाशिकमध्ये असताना राज ठाकरेंच्या समोर एक कार्यकर्ता मास्क घालून वावरत होता, त्यावेळी ‘मास्क काढ रे’ या शब्दात त्या कार्यकर्त्याला सुनावलं होतं. याचच एक उदाहरण द्यायचं झाल्यास मनसेची काही दिवसांपूर्वी वांद्रे येथे बैठक झाली. त्यावेळी महाराष्ट्रातील अनेक मनसे नेते उपस्थित होते. त्यांच्यापैकी एका नेत्यानेही मास्क घातला नव्हता, खुद्द राज ठाकरेही विनामास्क या बैठकीला आले होते.

काही दिवसांपूर्वी बाबासाहेब पुरंदरे यांची राज ठाकरेंनी भेट घेतली होती. या भेटीदरम्यान राज ठाकरे यांनी मास्क घातला होता. बाबासाहेब पुरंदरे आजारी असल्याने मास्क लावून त्यांना भेटायला गेल्याचं नंतर मनसेकडून सांगण्यात आलं.

त्यानंतर आज, 5 फेब्रुवारी रोजी लतादीदींच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राज ठाकरे ब्रिच कँडी रुग्णालयात पोहचले होते. त्यावेळीही ते मास्क घातल्याचं दिसून आलं. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला नाही, मात्र काही दिवसांपूर्वीची बाबासाहेब पुरंदरे यांची घेतलेली भेट आणि आता लतादीदींची घेतलेली भेट, तेही मास्क घालून, यामुळे एक गोष्ट नक्कीच समोर येते ती म्हणजे आजारी व्यक्तींना आपल्यामुळे त्रास होऊ नये, म्हणून आपण घेतलेली ही काळजी, असच काहीसं राज ठाकरे यांच्या या दोन फोटोंकडे बघून वाटतं.