आपलं शहर

Ramai Viewing : चैत्यभूमीवर उद्धव ठाकरे मुर्दाबाद, आदित्य ठाकरे मुर्दाबादच्या वंचितकडून घोषणा

काही दिवसांपूर्वीच राज्याचे पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी चैत्यभूमीवर विविंगचे उद्घाटन केले. काही दिवसात याला माता रमाई आंबेडकर असे नाव देण्यात आले. मात्र, या नावाचे अधिकृत पोस्टर या परिसरात सरकारकडून अद्याप लावण्यात आलेले नाही त्याविरोधात आज मुंबईतले वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले.

Ramai Viewing : काही दिवसांपूर्वीच राज्याचे पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी चैत्यभूमीवर विविंगचे उद्घाटन केले. काही दिवसात याला माता रमाई आंबेडकर असे नाव देण्यात आले. मात्र, या नावाचे अधिकृत पोस्टर या परिसरात सरकारकडून अद्याप लावण्यात आलेले नाही त्याविरोधात आज मुंबईतले वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. चैत्यभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येत मंत्री आदित्य ठाकरे यांनी उदघाटन केलेल्या शिळेवर रमाई व्हीविंग डेक असे पोस्टर लावले व माता रमाई जिंदाबाद अशा घोषणा दिल्या.

वंचितचे नेते आनंद जाधव म्हणाले की, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी चैत्यभूमीवर येऊन व्हीविंग डेकचे उद्घाटन केले. उद्घाटन झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं ही चैत्यभूमी आहे ही बाबासाहेबांच्या आठवण आहे याला माता रमाई आंबेडकर यांच नाव दिलं पाहिजे. लक्षात आल्यावर त्यांनी या संदर्भातली घोषणा केली.

मात्र, रमाईंच्या नावाचे कोणतेही पोस्टर अथवा फलक या परिसरात अद्याप लावण्यात आलेले नाहीत. हा या सरकारचा खोटेपणा आहे आमचं या सरकारला आवाहन आहे त्यांनी लवकरात लवकर शुद्धीत यावं नाहीतर आम्हाला या सरकारी विरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल. असा इशारा वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments